Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

..तर काँग्रेस घेणार ‘तो’ महत्वाचा निर्णय; राष्ट्रवादी अडचणीत, तर ठाकरेंच्या डोकेदुखीमध्ये वाढ

मुंबई : भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सर्वच राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तिघाडीचा वाद पेटला आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर शांत करण्यासाठी पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. त्याला शिवेसेनेची मूकसंमती आहे. मात्र, कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्याने आता या तिन्ही पक्षाची आघाडी मोडण्याची शक्यता व्यक्त झालेली आहे.

Advertisement

दि. ५ मे रोजी मराठा आरक्षण खटल्यात सुप्रीम कोर्टाने विरोधात निकाल दिल्यानंतर ती कसर भरून काढण्यासाठी राज्य शासनाने ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यावर काँग्रेसच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय सेलचे अध्यक्ष आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण वाढली आहे. त्यांना पाठींबा म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी थेट सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देऊन टाकली आहे. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.

Loading...
Advertisement

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सरकारमधून बाहेर पडतानाच ठाकरे सरकारला बाहेरून पाठींबा देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा सुरू झालेली आहे. एकूणच आरक्षणाचा मुद्दा आणि पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय हा महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आणण्यासाठी कारणीभूत ठरला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply