Tukaram Mundhe : म्हणून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली; पहा का सोडावा लागला पशुसंवर्धन विभाग

Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांची मागील वर्षी जुलैमध्ये त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्धविकास सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण आता अवघ्या वर्षभरातच त्यांची पुन्हा एकदा बदली झाली.

आता त्यांच्याकडे असंघटित कामगार विभागाच्या (मुंबई) विकास आयुक्तपदाची जबाबदारी दिली आहे. तर केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परतलेल्या व्ही. राधा यांची पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘या’ कारणामुळे तुकाराम मुंडे यांना सोडावा लागला पशुसंवर्धन विभाग

दरम्यान, तुकाराम मुंढे हे जिथे जिथे कामाला गेले तिथे ते जनतेत लोकप्रिय झाले पण त्यांच्या कामाची पद्धत नेत्यांना कधीच आवडली नाही.नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दलची नापसंती कायम आहे. वर्षांपूर्वीच त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली होती. त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाच्या सचिपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविली होती.

पण मुंढे यांचा विश्व मराठी संमलेनाच्या आयोजनावरून मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याशी वाद झाला. त्यातून अवघ्या काही महिन्यांतच त्यांची या विभागातून हकालपट्टी करण्यात आली. पुढे मुंढे यांनी पशुसंवर्धन विभागात लम्पी साथीच्या काळात जनावारांचे लसीकरण, महानंदचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दुग्धविकास मंडळाला चालविण्यास देणे, दूध उत्पादकांना अनुदान यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांची त्यांनी अंमलबजावणी केली.

पण दुष्काळी भागात चारा छावण्या, चारा डेपो आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यावरून मुंढे आणि पशुसंवर्धन विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात वाद झाला. याच वादातून ही बदली झाली आहे, अशी चर्चा सुरु आहे. याबाबत ‘दैनिक लोकसत्ता’ यांनी सविस्तर वृत्त दिले आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वादामुळे शिस्तप्रिय असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची बदली होत आहे, असे बोलले जात आहे.

Leave a Comment