Toyota Veloz । टोयोटा आता आपली नवीन कार लाँच करणार आहे. टोयोटाची ही नवीन एसयूव्ही इनोव्हा हायक्रॉसच्या निम्म्या किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. कारमध्ये 20 Kmpl मायलेज मिळेल.
टोयोटा वेलोज
टोयोटा वेलोज असे या नवीन कारचे नाव आहे. ती जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असून कार डिसेंबर 2024 पर्यंत भारतात सादर होईल. सध्या कंपनीने त्याच्या डिलिव्हरीच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. कंपनीची ही 7 सीटर कार असून ज्यात हाय पॉवर पेट्रोल इंजिन असेल. ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही येईल, जी लांबच्या मार्गावर चालवणे जास्त सोयीस्कर होईल.
Toyota ची नवीन कार ही मध्यम आकाराची MPV कार आहे, ज्याची लांबी 4475 मिमी, रुंदी 1775 मिमी आणि उंची 1770 मिमी इतकी आहे. ही 3-रो मोठ्या आकाराची कार असून यात कॅप्टन सीट मिळेल. या दमदार कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन असणार आहे. यामध्ये टर्बो इंजिन मिळेल. कारमध्ये 17 इंची अलॉय व्हील्स मिळतील. जे तिच्या लूकला हाय एंड लुक देईल. या कारला 20 kmpl पर्यंत मायलेज मिळेल.
क्रूझ कंट्रोल आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले
उच्च गतीसाठी, या टोयोटा कारमध्ये 4 सिलेंडर 16-व्हॉल्व्ह इंजिन असून कार हाय पिकअपसाठी 106 पीएस पॉवर आणि 138 एनएम टॉर्क जनरेट करेल. या कारमध्ये क्रुझ कंट्रोल आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले यासारखे शानदार फीचर्स मिळतील. या कारमध्ये वायरलेस चार्जर, 3 ड्राइव्ह मोड आणि 9-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले पाहायला मिळेल. ही कार ॲम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारख्या नवीन पिढीच्या फीचरसह उपलब्ध असेल.