Toyota Rumion : टोयोटाचा धमाका! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येईल 26 kmpl मायलेज देणारी शानदार कार, पहा फीचर्स

Toyota Rumion : दरवर्षी लाखो लोक आपल्या स्वप्नातली कार खरेदी करत असतात. पण मागील काही दिवसांपासून सर्वच कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. तुम्हाला कार खरेदी करायची आहे आणि तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे, तुम्ही आता टोयोटाची कार खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कंपनीच्या या कारमध्ये 26 kmpl मायलेज मिळते आणि फीचर्स देखील उत्तम आहेत. कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह खरेदी करता येईल.

मिळतील 5 रंग पर्याय आणि दोन ट्रान्समिशन

मायलेजबाबत बोलायचे झाले तर Toyota Rumion चे वेगवेगळे प्रकार 20.11 ते 26.11 kmpl पर्यंत मायलेज देतात. हे लक्षात की ही मोठ्या आकाराची कार 10.44 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीत ऑफर करण्यात येत आहे. कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येत असून कंपनी या कारचे 5 रंग पर्याय देत आहे.

सहा एअरबॅग्ज

Toyota Rumion मध्ये सहा एअरबॅग्ज आणि Advanced Driving Assistant System, इतर कोणतेही वाहन कारच्या अगदी जवळ आले तर ही प्रणाली अलर्ट जारी करते. ही कार 103 bhp चा पॉवर आणि 137Nm चा टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे खराब रस्त्यांवर ती जास्त स्पीड मिळवते. कारमध्ये सीट बेल्ट रिमाइंडर, टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल सारखी शानदार फीचर्स उपलब्ध करून दिली आहेत.

Toyota Rumion ची स्मार्ट फीचर्स

  • CNG वर 87bhp पॉवर आणि 121Nm टॉर्क
  • मिळेल 5 आणि 6 स्पीड ट्रान्समिशनचा पर्याय
  • कार देईल 170 kmph चा टॉप स्पीड

Leave a Comment