Toyota New Car Launching | ‘या’ आलिशान कारचा टीझर झाला सुसाट; भारतात पण झाली की लाँच

Toyota New Car Launching | मुंबई: कारच्या जगतात नवीन कोणतं मॉडेल आले आहे याकडे कारप्रेमींचे लक्ष लागलेले असते. परदेशी बनावटीच्या कारमधील सुविधा तर नेहमीच जगभरातील कारचालकांना भुरळ घालत असतात. कारविश्वात टोयोटा कंपनीचा बोलबाला चांगलाच आहे. त्यामुळे या कंपनीतर्फे लाँच होणाऱ्या कार आणि त्यांचा आलिशान लुक नेहमीच चर्चेत असतो. टोयोटा कंपनीची एक जबदरस्त आलिशान कार (Toyota New Car Launching) भारतात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने या कारचा टीझर नुकताच प्रदर्शित केला आणि सोशलमीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Toyota New Car Launching याचे नाव आहे टोयोटा टेसर (Toyota’s Urban Cruiser Taisor)

आता या कारला प्रत्यक्ष पाहण्याची भारतीयांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ३ एप्रिल 2024 रोजी टोयोटा टेसर ही आलिशान कार भारतात लाँच होणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी या कारची ऑनरोड किंमत जाहीर केली जाणार आहे. टोयोटा इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून मारूती सुझुकी फ्रंट स्टाइल असलेल्या क्रॉसओव्हर टसर एसयूव्ही या कारचा टीझर जारी करताच कधी एकदा ही कार भारतात येते याची उत्सुकता होती.

Toyota New Car details Launching | Toyota’s Urban Cruiser Taisor

अनेक नव्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनसह भारतात पदार्पण होत असलेल्या या टोयोटा टेसर (Toyota’s Urban Cruiser Taisor) कारकडे अनेकांच्या माना वळतील यात शंका नाही इतकी या कारची खासियत आहे. अलॉय व्हील सेट हे या टोयोटा टेसर कारचे वैशिष्ट्य आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की असं या या कारमध्ये नेमकं आहे तरी काय ? कारमध्ये बसल्यानंतर तुमच्या डोळयांचे आणि मनाचे पारणे फिटेल अशा आरामदायी आणि आलिशान अनुभवासाठी टोयोटा कंपनी अग्रेसर आहे. त्यामुळे या नव्या कारमधील फिचर्सही तसेच आहेत. चला तर जाणून घेऊया नव्याने दाखल होणाऱ्या टोयोटा टेसर या कारमध्ये काय सुविधा आहेत.

टोयोटाच्या टेसर एसयूव्ही या कारमधून होणारा प्रवास आरामदायक तर होणारच आहे पण त्यासोबत ऑटोतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या सुविधांचा खजिना या कारमध्ये आहे.  वायरलेस फोन कनेक्टीव्हीटी, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ३६० डिग्री सराऊंड कॅमेरा, हेडअप डिस्प्ले, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, अॅम्बियंट लायटिंग, इन्फोटेन्मेंट स्क्रीन आणि पॉवरफूल इंजिन अशा तंत्रज्ञानाने ही कार सुसज्ज आहे. तेव्हा नवीन कार घेण्याचे प्लॅनिंग करत असलेल्या कारप्रेमींना टोयोटा टझर या आलिशान कारने खुणावले नाही तरच नवल.

Leave a Comment