Tourist Spots । पर्यटकांनो.. फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर घातली बंदी, जाणून घ्या

Tourist Spots । राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकजण या काळात फिरायला जातात. पण फिरायला गेलेल्या अनेकजणांचा मृत्यू झाला आहे.

अशातच आता यंदा पावसाळी पर्यटनाला ब्रेक लागला आहे. सध्या पुणे, सांगली, कोल्हापूर, तसेच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून आजही सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा तसेच रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 25 ते 30 जुलै 2024 पर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाकडून सातारा जिल्हयात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामधील धबधबे आणि पर्यटनस्थळे तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले असून या जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे, पाटण तालुक्यातील ओझर्ड (नवजा) व सडावाघापूर धबधबा, कास तलाव तसेच जावली तालुक्यातील ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः पावसाळ्यात फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. येथे अनेक दुर्घटना घडत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये व जिवीत व वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment