Tourist places : पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर ‘या’ मनमोहक ठिकाणांना नक्की भेट द्या

Tourist places : पावसाळ्याच्या दिवसात अनेकजण मनाली, शिमला यांसारख्या ठिकाणांना भेटी देतात. पण प्रत्येकाला या ठिकाणी जात येते असे नाही. पण तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात काही ठिकाणांना भेटी दिल्या तर तुम्ही मनाली, शिमला या ठिकाणांना विसरून जाऊ शकता.

पावसाळ्याच्या दिवसात निसर्गसौंदर्यही जास्त बहरत असते. अशा परिस्थितीत तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे वातावरण आल्हाददायक असेल, थंडगार वारे तुम्हाला स्पर्श करून जात असतील आणि निसर्गाचे सुंदर दृश्य समोर असेल, तर यापेक्षा आणखी काय पाहिजे? कोणासाठीही अशी सहल त्यांच्या आयुष्यात अविस्मरणीय होते. भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यात भेट देणे म्हणजे पृथ्वीवर स्वर्ग गाठल्यासारखे होईल.

चेरापुंजी

भारतात कुठेही जास्त पाऊस पडत असेल तर ते ठिकाण म्हणजे चेरापुंजी होय. मेघालयाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असून पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य आणखी वाढत जाते.

कोडाईकनाल

तामिळनाडूमधील कोडाईकनाल हे सर्वात सुंदर नैसर्गिक ठिकाणांपैकी एक असून तिला ‘प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन्स’ म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्याच्या दिवसात येथील हिरवळ आणि हवामानात दिसणारे हलके नैसर्गिक धुके हे दृश्य जास्तच विलोभनीय बनवते.

माउंट अबू

राजस्थान हे सर्वात उष्ण राज्यांपैकी एक असले तरी येथील माउंट अबू हे हिल स्टेशन लोकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक असून पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही माउंट अबूला भेट देऊ शकता. नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेण्यासोबतच तुम्ही येथील मंदिरांना देखील भेट देऊ शकता. पावसाळ्याच्या दिवसात माउंट अबूच्या तलावांचे आणि पर्वतांचे सौंदर्य आणखी वाढत जाते.

कुर्ग

पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही कुर्ग, कर्नाटकला भेट देऊ शकता. हिरवीगार जंगले आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे पावसात आणखीनच सुंदर दिसतात. पावसाळ्यात या ठिकाणी हिरव्यागार कॉफीचे मळे बघण्याचा आनंद वेगळाच असतो.

मुन्नार

समजा तुम्हाला हिरव्यागार ठिकाणी भेट द्यायची असेल आणि आरामशीर वेळ घालवायचा असेल तर कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासह मुन्नारला जाऊ शकता. पावसाळ्यात तुम्ही केरळच्या मुन्नारला भेट द्या कारण या काळात इथले हवामान आणि चहाच्या बागांचे दृश्य अतिशय सुंदर असते.

Leave a Comment