Tourist Place : एकदा याल मोहून जाल! ‘या’ ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक देतात भेटी

Tourist Place : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात अनेकजण विविध ठिकाणांना भेटी देतात. अनेकजण आपल्या मित्रपरिवारांसोबत पर्यटनस्थळी जातात. महाराष्ट्रातलं एक असं ठिकाण आहे जिथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत असलेला नाणे घाट हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असणारे ठिकाण असून इथली खास गोष्ट म्हणजे उलटा धबधबा. आत्तापर्यंत अनेकजणांनी धबधब्यांना भेट दिली असेल पण पावसाळ्याच्या दिवसात नाणे घाटाला भेट देण्याचा एक वेगळाच अनुभव आहे.

नाणे घाटातील उलट्या धबधब्याचे दृश्य फक्त पावसाळ्यातच दिसते. पावसाळ्याच्या दिवसात येथे मुसळधार पाऊस पडतो आणि आजूबाजूच्या डोंगर-दऱ्यांतून पाणी साठून मैदानाकडे जाते. पाणी गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध वरच्या दिशेने वाहत असल्याचे दिसते.

कधी द्यावी भेट?

तुम्ही नाणे घाट रिव्हर्स धबधब्याचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी पावसाळ्यात नियोजन करू शकतात. जून ते सप्टेंबर दरम्यान तुम्ही नाणे घाटाला भेट देऊ शकता. या ठिकाणी हिरवेगार वातावरण पाहिल्यानंतर तुमचे डोळे हे सौंदर्य विसरू शकणार नाहीत. पण येथे जाण्यापूर्वी तेथील हवामानाची माहिती घेणे खूप गरजेचे आहे.

लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

हे लक्षात घ्या कोणताही धोका किंवा अपघात टाळण्यासाठी, फक्त सुचवलेल्या मार्गांचे अनुसरण करा.
निसरड्या भागाची काळजी घ्या.
तसेच उंच कडा किंवा उंच उतारापासून सुरक्षित अंतर ठेवा
इतकेच नाही तर बदलत्या हवामानावर लक्ष ठेवा आणि अचानक होणाऱ्या बदलांसाठी तयार रहा

जर तुम्ही नाणे घाटाला भेट देण्याचा विचार करत असाल तर पिण्याचे पाणी, सनस्क्रीन आणि स्नॅक्स सोबत ठेवा. या ठिकाणची सुंदर दृश्ये टिपण्यासाठी कॅमेरा किंवा स्मार्टफोन सोबत ठेवा. इतकेच नाही तर या ठिकाणी सहलीची योजना फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच करा.

Leave a Comment