Travel News : आता कोरोनाचे (Corona) संकट टळले आहे. कोरोनात बंद पडलेले उद्योग व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झाली आहे. भारतीयांचा परदेशातील संचारही (Travel) वाढला आहे. परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल की भारतीय लोक दर महिन्याला परदेशी प्रवासावर किती पैसे खर्च करतात.
आज आम्ही तुम्हाला तेच तर सांगणार आहोत. भारतीयांच्या परदेश वारीचे आकडे ऐकून तुम्हाला निश्चितच धक्का बसेल. भारतीय नागरिक दर महिन्याला परदेशी प्रवासावर जवळपास एक अब्ज डॉलर्स खर्च करत आहेत. एका डॉलरचे (Dollar) भारतीय रुपयांतील मूल्य जवळपास 82.87 रुपये आहे. म्हणजेच भारतीय नागरिक दर महिन्याला तब्बल 8 अब्ज 28 कोटी रुपये परदेश प्रवासासाठी खर्च करत आहेत.
रिजर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये प्रवास खर्च USD 4.16 अब्ज आणि कोविडपूर्वी 2019-20 मध्ये USD 5.4 बिलियन होता. ‘वी 3 ऑनलाइन’ कंपनीचे भागीदार सपन गुप्ता म्हणाले, की भारतीय त्यांच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह जगभर प्रवास करत आहेत. व्हिएतनाम, युरोप आणि बाली ही काही प्रमुख ठिकाणे आहेत जी भारतीयांना आवडतात. युरोप, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि दुबई या ठिकाणांना भारतीयांची पसंती आहे. सध्या प्रवासी उद्योग मोठ्या प्रमाणात तेजीत आहे.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
75% लोक आता त्यांच्या सुट्टीसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाची निवड करत आहेत. युरोप, बाली, व्हिएतनाम आणि दुबई सारख्या ठिकाणांना भारतीयांची मागणी वाढली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पुढील आर्थिक वर्षापासून परदेश टूर पॅकेजवरील टीसीएसचा दर सध्याच्या 5 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावामुळे भारतीयांच्या परदेश प्रवासावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. RBI ने दिलेल्या आकडेवारीनुसार 2020-21 मध्ये मुख्यतः कोविड-19 (Covid 19) च्या उद्रेकानंतर आलेल्या निर्बंधांमुळे प्रवासावरील खर्च कमी होऊन USD 3.23 अब्ज झाला होता.