Toothpaste Side Effects : सावधान! तुम्हीही अशी टूथपेस्ट वापरताय का? होऊ शकतो कॅन्सर

Toothpaste Side Effects : बाजारात विविध कंपन्यांची टूथपेस्ट आहे. जर तुम्ही टूथपेस्ट खरेदी करणार असाल तर त्यापूर्वी तुम्हाला त्याबाबत माहिती असावी. कारण काही टूथपेस्टमुळे कॅन्सरसारखा घातक आजार होण्याची शक्यता असते, कसे ते जाणून घ्या.

हे लक्षात ठेवा की टूथपेस्टमुळे होणाऱ्या हानीची कारणे वेगळी असू शकतात. तुम्ही कोणत्या प्रकारची टूथपेस्ट वापरत आहात आणि त्यात कोणत्या प्रकारची रसायने वापरली आहे याची माहिती तुम्हाला असावी.

तुम्हीही अशी टूथपेस्ट वापरत नाही ना?

टूथपेस्ट खरेदी करताना टूथपेस्टमध्ये कोणत्या प्रकारची संयुगे वापरली गेली आहेत याकडे नक्की लक्ष द्या. तुम्हाला त्यात सोडियम लॉरील सल्फेट (SLS) सारखे कंपाऊंड दिसल्यास ती टूथपेस्ट खरेदी करू नका. कारण SLS असलेली टूथपेस्ट तुमच्या तोंडाच्या आरोग्याला हानी पोहोचवेल.

सोडियम लॉरील सल्फेट

सोडियम लॉरील सल्फेट हे असेच एक प्रमुख संयुग असून जे पेस्ट घट्ट होण्यास मदत करते. ते सहज वापरता येते. त्याचा वापर साबणामध्ये साबण बनवण्यासारखा आहे. SLS चे काम फोम तयार करून दात स्वच्छ करणे असून अनेकजण सोडियम लॉरील सल्फेट वापरून टूथपेस्ट तयार करतात. हे इतर पर्यायांच्या तुलनेत ते स्वस्त आणि वापरण्यास सोपे आहे. SLS असलेली टूथपेस्ट लोकांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

अल्सरचा धोका – अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की SLS मुळे अल्सरचा धोका होतो. त्याचा वापर तोंडाचा पहिला थर नष्ट करू शकतो, ज्यामुळे तोंडात अल्सर होऊ शकतो.

ऍलर्जी- सोडियम लॉरील सल्फेट असणाऱ्या टूथपेस्टमुळे तोंडाची ऍलर्जी होण्याचा धोका असतो. तोंडाला खाज सुटणे आणि त्वचेला आतून तडे जाणे सामान्य असून SLS असलेल्या टूथपेस्टमुळे देखील हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

श्वासाची दुर्गंधी- SLS असलेल्या टूथपेस्टमुळे श्वासाची दुर्गंधी येते.

Leave a Comment