Tomato Rate Control: नाशिक : सध्या देशभरात शेती क्षेत्रातील फक्त एकच बातमी ट्रेंडमध्ये आहे. ती म्हणजे टोमॅटोचे वाढलेले अफाट भाव. मात्र, हे भाव काही कायमस्वरूपी मिळणार नाहीत. काहीच दिवसात या फळभाजीचे भाव पुन्हा एकदा खाली येऊन स्थिरावतील. मात्र, बाजाराच्या नैसर्गिक नियमाने हे होण्याच्या अगोदरच सरकारी हस्तक्षेपातून याचे भाव पडण्याची चिन्हे आता दिसत आहेत. होय, सरकारी खरेदी सुरू झाली की बाजारातील टोमेटोचे भाव झपाट्याने कमी होण्याची शक्यता बाजारातील आडत्या व व्यापाऱ्यांना वाटत आहे.
दिल्लीसह देशातील काही मोठ्या शहरात टोमॅटोचे वाढलेले भाव ही मोठीच सरकारी डोकेदुखी ठरल्याच्या बातम्या वेगाने प्रसिद्ध होत आहेत. अशावेळी बाजारात मागणीपेक्षा कमी टोमॅटोची आवक नेमकी का सुरू आहे याचाच विसर पत्रकार आणि या क्षेत्रातील तज्ञ म्हणवणाऱ्या मंडळींना पडला आहे. कारण, सध्या हजारो शेतकऱ्यांचे उभे पीक धोक्यात आल्याने उत्पादन कमी झाल्याने बाजाराच्या मागणी व पुरवठा नियमाने हे भाव वाढलेले आहेत. आतापर्यंत यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक झटका सहन करावा लागत असल्याच्या बातम्या गायब आहेत.
- Mumbai News : धक्कादायक! बापानेच केली 10 वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या; कारण जाणुन वाटेल आश्चर्य
- Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना धक्का! ‘त्या’ प्रकरणात साखर कारखान्याची कोट्यवधींची मालमत्ता जप्त
- Pune Accident : भीषण अपघात! भरधाव कारने 5 मजुरांना चिरडले; 2 मजुरांचा जागीच मृत्यू
- Maharashtra Rain Alert: विजांच्या कडकडाटासह पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी
- Electric Bullet : अनेकांची वाढणार धाकधुक! दिवाळीत लॉन्च होणार इलेक्ट्रिक बुलेट; खासियत जाणुन व्हाल थक्क
फक्त टोमॅटोचे पीक कोणाला लखोपती करून गेले याच्याच बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असे शेतकरी बातमीतून गायब आहेत. अनेकजण यावरून शेतकरी समस्या सुटल्या अशाच थाटात सोशल मिडियामध्ये लेखन करत आहेत. अशावेळी आता नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ हे महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथून टोमॅटो खरेदी करून दिल्लीतील प्रमुख ग्राहक केंद्रावर स्वस्तात देणार असल्याची बातमी येऊन धडकली आहे. अशावेळी काही टोमॅटो अशा सरकारी संस्थांनी खरेदी केल्यावर आणि त्याची कमी भावाने विक्री केल्यावर मग बाजारात कृत्रिम पद्धतीने भाव कमी होणार आहेत. कांदा आणि इतर तृणधान्य व कडधान्य याबाबत सरकारने अशी यशस्वी खेळी केल्याचे उदाहरणे आहेत. त्याच पद्धतीने टोमॅटो या फळपिकाला असाच सुलतानी झटका सहन करावा लागण्याची आता चिन्हे आहेत. त्यामुळेच बाजारात नवीन टोमॅटो आवक सुरू होण्याच्या बातम्या पेरण्यास सुरुवात झाल्याची शंका व्यक्त होत आहे.