Tomato Face Pack : प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. यासाठी अत्यंत महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर केला जातो पण, ते चेहऱ्याला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने तुमची त्वचा चमकदार बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला टोमॅटोच्या फेस पॅकबद्दल (Tomato Face Pack) सांगणार आहोत जो चेहऱ्यावर लावल्याने त्वचेशी (Skin) संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. हे फेस पॅक कसे बनवायचे ते जाणून घेऊ या.
टोमॅटो आणि काकडी
हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात टोमॅटोचा रस घ्या, त्यात काकडीची पेस्ट मिक्स करा. या मिश्रणात मधही मिसळा. आता ते चेहऱ्यावर लावा. साधारण 15-20 मिनिटांनी पाण्याने चेहरा धुऊन टाका. या फेसपॅकमुळे त्वचेचे अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.
टोमॅटो आणि ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइल उत्कृष्ट मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे करण्यासाठी टोमॅटोची पेस्ट तयार करा. त्यात एक चमचा ऑलिव्ह तेल घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. या पॅकचा वापर केल्याने त्वचा मुलायम राहते.
टोमॅटो आणि लिंबू पॅक
टोमॅटोचा रस एका लहान भांड्यात घ्या. त्यात दही आणि लिंबाचा रस मिसळा. हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्या. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही वेळाने पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
टोमॅटो आणि ओट्स फेस पॅक
एका भांड्यात टोमॅटोचा रस आणि ओटमील पावडर घाला. या मिश्रणात काकडीची पेस्टही टाकता येते. आता ते चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका.
टोमॅटो आणि मध
टोमॅटोच्या रसात मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यावर लावा. काही वेळाने पाण्याने चेहरा धुऊन टाका.
टीप : लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.