Today’s Pune News: पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्या बदलीची चर्चा (transfer of Pune Municipal Commissioner Vikram Kumar) पुणे महापालिकेमध्ये सुरू होती मात्र त्यांची बदली झाली नसली तरी कुमार वैद्यकीय कारणामुळे रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत बुधवारी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढले आहेत. दरम्यान, काल (ता.१४) पुणे महापालिकेच्या प्रशासकाची मुदत संपलेली असताना याबाबत शासनाकडून महापालिकेला अद्याप कोणतेही पत्र आलेले नाही.
- Must Read This :
- RuPay credit cards: Snapdeal ने कार्ड केले लाँच; कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घ्या
- Tata new car to be launched: दसऱ्यात येणार ड्रीम कार; पहा फीचर आणि प्राइस अपडेट
- ‘Truecaller वापरणे आहे असुरक्षित?’; असा प्रश्न पडलेल्यांनी वाचा ही महत्वाची बातमी
पुणे महापालिकेची मदत १४ मार्च २०२२ रोजी संपली. त्यानंतर १५ मार्चपासून विक्रम कुमार हे पुणे महापालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या सहा महिन्यात स्थायी समिती, मुख्य सभेतील धोरणात्मक व आर्थिक निर्णय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाकडून निर्णय घेतले जात आहेत. या प्रशासक काळाची मुदत आज १४ सप्टेंबर रोजी संपलेली आहे. महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने व नवीन सभासद निवडणूक झाल्याने प्रशासक काळास मुदतवाढ देणे आवश्यक आहे. महापालिकेला या संदर्भात अद्याप कोणतेही पत्र मिळालेले नाही, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. (It is necessary to extend the term of the administrator due to the non-election of the municipal corporation and the election of new members. Municipal officials said that the corporation has not yet received any letter in this regard.)
दरम्यान, विक्रम कुमार यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून पुणे महापालिकेत सुरू आहे पिंपरी चिंचवड पीएमआरडीए येथील आयुक्त बदलले मात्र पुणे महापालिकेचे आयुक्तांची बदली झालेली नव्हती आयुक्तांनी बदली रोखण्यासाठी मुंबईत जाऊन प्रयत्न केल्याचेही चर्चा आहे असे असताना गणेश विसर्जनाच्या दिवशी विक्रम कुमार यांची तब्येत बिघडली. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते सध्या वैद्यकीय रजेवर गेलेले आहेत. या काळात महापालिकेचा कार्यभार पाहण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे या आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सु. मो. महाडिक यांनी हे पत्र काढले आहे.