Today’s Pune News: पुणे: राज्याचे नेतृत्व करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अजेंड्यावर त्यांच्या समर्थक आमदारांच्या मतदारसंघांना भेटी देणे व उरलेला वेळ मंडळांना भेटी देण्यात येत आहेत यामध्ये राज्याच्या विकासाचा अजेंडा कुठेही नाही. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत (Uday Samant) हे दोघे उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या सरकारमध्ये मंत्री होते तरीहीच त्यांनी पूर्वीच्या सरकारने कोणतेही वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) प्रकल्पासाठी प्रयत्न केले नाहीत असे वक्तव्य करणे ही कामाची पद्धत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्रासाठी आणखी मोठा प्रकल्प देऊ असे आश्वासन देणे म्हणजे लहान मुलाची समजून घालण्यासारखा प्रकार आहे यात महाराष्ट्राचे प्रतिष्ठा नाही,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांनी केली.
- हेही नक्कीच वाचा की..:
- Vedanta-Foxconn: आणि गुजरातचा महाराष्ट्राला झटका..! शिंदे-फडणवीस सरकार हतबल
- Business : पावसाळ्यात सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल चांगल्या उत्पन्नाची हमी; जाणून घ्या..
- Share Market : दिलासा…! आता शेअर मार्केटमध्ये होणार नाही नुकसान ; सेबीने घेतला ‘तो’ मोठा निर्णय
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला (Gujarat) पळवल्यावर राज्य सरकारवर टीका होत आहे या संदर्भात शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद (Pune press conference) घेऊन भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, ” हा प्रकल्प तळेगावला (Talegaon) येणार होता, त्यासाठी आवश्यक निर्णय झाले. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जायला नको होता, पण आता यावर चर्चा करून अर्थ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मागच्या राजवटीत काही निर्णय घेतला नाही असे सांगितले. हे दोघेही उद्धव ठाकरे सरकारमध्ये जे मंत्री होते, आता तेच भाषा करत आहेत, ही काम करण्याची पद्धत नाही.
यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रला देईल असे पंतप्रधान सांगितले लहान मुलांची समजून काढताना हा फुगा दुसऱ्या मुलाला दे तुला मी दुसरा मोठा फुगा देतो अशी समजून काढण्याचा प्रकार आहे. यात महाराष्ट्राची ही प्रतिष्ठा नाही. केंद्राची सत्ता हातात असल्याचे फायदे होत आहेत. शहा (Amit Shaha), मोदी व अजुन लोक आहेत त्याचा फायदा गुजरातला होतो. जास्त दौरे गुजरातला होतात, कोणालाही घरची ओढ असते. तळेगाव येथे प्रकल्प झाला असता कर त्या कंपनीला अधिक सोईचा होता, पण त्या कंपनीचे मालकांनी तिकडे जायचा निर्णय घेतला.
उद्योगांना प्रोत्साहित करणारी यंत्रणा : पूर्वी आंतरराष्ट्रीय कंपन्यांची (International companies) गुंतवणूक (investment) करण्यात महाराष्ट्र एक नंबरला होता, त्याचे महत्वाचे कारण म्हणजे राज्याचे नेतृत्व (state leadership) त्यांना प्रोत्साहित करत होते. नवीन इंडस्ट्री येणार असेल तर महाराष्ट्रात यावे यासाठी अधिकारी प्रयत्न करत, कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटून प्रयत्न करत होते. आता ही यंत्रणा थंड झाली आहे, अशी टीका पवार यांनी केली.