Today’s Pune News: पुणे (Pune) : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) भाजपच्या शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये असताना आता थेट भारतीय जनता पक्षाच्या (Bhartiya Janata Party) महाराष्ट्र प्रदेश सरचिणीसपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष (BJP state president) चंद्रशेखर बावनकुळे  (Chandrashekhar bavankule)यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिणीसपदी त्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र बावनकुळे यांनी जाहीर केली आहे.

ठाण्याच्या माधवी नाईक (Thane Madhavi Naik) रायगडचे विक्रांत पाटील (Raigad Vikrant Patil) अकोल्याचे रणधीर सावकार (Akola Randhir savkar) संभाजीनगरचे संजय केनेकर (Sambhaji Nagar Sanjay kenekar) यांची देखील प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या या अचानक झालेल्या नियुक्तीमुळे पुणे भाजपमध्ये (Pune BJP) आता एकच चर्चा होत आहे. पुण्यातील राजकारणात भाजपाचे महत्वाचे नेतृत्व असलेल्या मोहोळ यांच्याकडे राज्य पातळीवरील जबाबदारी देण्यात आल्यामुळे, पक्षात चर्चा सुरू झाली आहे. तर्क -वितर्कांना उधान आले आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच मोहोळ यांच्याकडे केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकदावर नियुक्ती करण्यात आली होती.

मोहोळ यांच्यावर पक्षाच्या राज्यपातळीवरची महत्त्वाची जबाबदारी दिल्याने पक्षाच्या केंद्रीय नेत्यांपर्यंत त्यांचा संपर्क वाढत जाणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत २०१७ साली भाजपाची सत्ता आल्यानंतर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष (standing committee chairman) झाले. त्यानंतर महापौर (Pune Mayor) झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना पुण्याचे उमेदवार म्हणून पाहिले जाते. भाजपसह इतरही अनेक पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP leader Ajit Pawar) यांच्यासोबतही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra fadnavis) खास मर्जीतले म्हणून ते ओळखले जातात. कोरोना आणि लॉकडाऊन काळात महापौर म्हणून मोहोळ यांनी पेललेली जबबादारी आणि शहराच्या प्रश्नांचे अभ्यासू नेते यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version