मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीत सुधारणा होताना दिसत आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 49 हजार रुपये प्रति तोळा असून, मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 48,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. तसेच सध्या चांदी 67,800 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादनशुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात..
सध्या लग्नसराईची चाहूल लागली आहे. त्यामुळे सोनं महागणार, हे निश्चित.. लग्न- संमारंभामुळे सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यामुळे सोन्याचा दरही वाढला आहे. 12 एप्रिलच्या तुलनेत 22 कॅरेट सोने 40 रुपयांनी, तर 24 कॅरेट सोने 43 रुपयांनी वाढले आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅममागे 49 हजार रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला असून, मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,450 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 49,100 असेल, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 53,550 रुपये असेल. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 49,100 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 53,550 रुपये आहे.
गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत तेजी दिसली आहे. सोन्याचे दर 12 टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीत एक वर्षापूर्वी 24 कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा 47890 रुपये होती. आज 24 कॅरट सोन्याचे भाव 53450 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.
दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ असं या अॅपचं नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसंच या अॅपच्या मदतीने तुम्ही यासंबंधित तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
चीनमध्ये सुरू आहे कोरोनाचे थैमान; भारताने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; जाणून घ्या कोरोना अपडेट
खुशखबर, नोकर भरतीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, तरुणांचा होणार फायदा..