TMC Candidates List : लोकसभा निवडणुका जवळ (TMC Candidates List) आलेल्या असतानाच विरोधकांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्याची (West Bengal) भीती होती तेच झालं. राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या जागावाटपात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात एकमत झाले नाही. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने रविवारी राज्यातील सर्व 42 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये क्रिकेट खेळाडूंसह विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला बहरामपूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. या मतदारसंघात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी विजयी होत आले आहेत. या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये प्रचंड (Congress Party) अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेस नेत्यांवर टीएमसीवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
टीएमसीने राज्यातील (TMC) सर्व मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करून हे सिद्ध केले आहे की या पक्षावर राजकीय नेत किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विश्वास ठेऊ नये. टीएमसीच्या उमेदवारांची यादी म्हणजे पंतप्रधान कार्यालयाला संदेश आहे की टीएमसी आता इंडिया आघाडीबरोबर नाही.
Rajya Sabha Election : मोठा विजय तरीही बहुमत नाही; भाजपाला किती जागा कमी? बाकी पक्षांचं काय?
TMC Candidates List
केंद्र सरकारला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घाबरल्या आहेत. जर त्या इंडिया आघाडीबरोबर राहिल्या असत्या तर केंद्राने ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला असता. त्यामुळे यादी जाहीर करून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला संदेश दिला आहे की तुम्ही नाराज होऊ नका, मी आता इंडिया आघाडीबरोबर नाही, अशी खोचक टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली.
जागावाटपात इंडिया आघाडीला जागा न देता ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दाखवून दिले आहे की त्या कुणालाही धोका देऊ शकतात. त्यामुळे आता कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये.
TMC Candidates List
दरम्यान, याआधी असे सांगितले जात होते की पश्चिम बंगालमध्ये टीएमसी काँग्रेसला तीन ते पाच देऊ शकते. परंतु, या चर्चा अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. टीएमसीने आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीत दिसणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
Congress First List : दिग्गज अन् ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसच्या प्लॅनिंग नेमकं काय?