TikTok Ban in America : चिनी ॲप टिकटॉक वर भारतात खूप आधीच बंदी घालण्यात आली (TikTok Ban in America) आहे आता अमेरिकेनेही त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने टिकटॉक या चायनीज ॲपवर बंदी घालण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात मंजूर करण्यात आला यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले की हे योग्य नाही टिकटॉक अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आहे यात काहीही तथ्य नाही. स्पर्धा न करू शकल्याने ही कृती अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने मंजूर केलेल्या ठरावात टिकटॉक समोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत एक तर तिच्या मूळ कंपनीने सहा महिन्यांत अमेरिकेत टिकटॉकची विक्री करावी किंवा देशव्यापी बंदीसाठी तयार राहावे. चीनने यातील दुसरा पर्याय निवडला. याआधी टिकटॉक वर भारत, युरोपियन युनियन आणि कॅनडा या देशांनी बंदी घातली आहे.
TikTok Ban in America
China News : जिनपिंग आणखी शक्तिशाली; चीनमध्ये सत्ताधाऱ्यांनी टाकला ‘हा’ मोठ्ठा डाव!
भारताचे उदाहरण देताना अमेरिकन खासदारांनी सांगितले, की भारताने 2020 मध्ये देशाच्या सुरक्षेसाठी टिकटॉक वर बंदी घातली होती. परंतु आपल्याकडे अजूनही यावर फक्त विचार केला जात आहे. त्याचवेळी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग व्हेन बिन यांनी आरोप केला आहे की अमेरिकेची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे आणि स्पर्धेचे घोर उल्लंघन आहे.
ते म्हणाले की, अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. यादरम्यान वेन बिन यांनी इशारा दिला आहे की निर्बंधांच्या या कारवाईचा अमेरिकेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने टिकटॉकच्या सध्याच्या मालकी संरचनेला देशाच्या सुरक्षेसाठी धोका मानून 65 विरुद्ध 352 मतांनी एकमताने मंजूर केले. हा प्रस्ताव वरच्या सभागृहात म्हणजेच सिनेटकडे पाठवला जाईल. टिकटॉक वापरणाऱ्यांची संख्या अमेरिकेत सुद्धा खूप मोठी आहे.
TikTok Ban in America
China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च
अमेरिकन खासदारांनी असा युक्तिवाद केला की बाईटडान्स कंपनीवर चीन सरकारचे नियंत्रण आहे अशा परिस्थितीत जर चीन सरकारला हवे असेल तर ते अमेरिकन टिकटॉक वापरकर्त्यांच्या डेटा गोळा करण्याची मागणी करू शकतात बाइटडान्स लिमिटेड ही चीनची उपकंपनी आहे.