Thyroid Symptoms । आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो. अनेकदा हे आजार जीवघेणे ठरतात.
थायरॉईड संप्रेरक थेट हृदय गती, चयापचय आणि शरीराचे तापमान प्रभावित करत असून हे स्नायू, हाडे आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते, परंतु जर आपल्या शरीरातील थायरॉईड हार्मोनचे संतुलन बिघडल्यास आपल्या शरीराचे वजन वाढू किंवा कमी होऊ लागते. अशा वेळी पायांमध्ये दिसणाऱ्या काही लक्षणांच्या मदतीने तुम्ही तुमच्या थायरॉईड ग्रंथीमध्ये समस्या असल्याचे समजेल.
तीव्र क्रॅम्प आणि वेदना
हायपोथायरॉईडीझममुळे स्नायू, नसा आणि सांधे दुखतात. यामुळे पायांमध्ये तीव्र क्रॅम्प आणि वेदना होतात.
हातपाय थंड होणे
थायरॉईडमुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होऊन हातपाय थंड होऊ लागतात.
पायांना खाज सुटणे
थायरॉईडच्या समस्येमुळे त्वचा कोरडी होऊन पायांना खाज आणि मुंग्या येतात.
पायाच्या नखांच्या समस्या
शरीरात थायरॉईड संप्रेरकाची कमतरता किंवा जास्तीमुळे हात आणि बोटांच्या नखांमध्ये विकृती दिसते.
पायाचे तळवे पिवळसर होणे
थायरॉईडची समस्या असेल तर बीटा कॅरोटीनचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर करणे शरीरासाठी कठीण होते, ज्यामुळे बीटा कॅरोटीन शरीरात जमा होते. त्यामुळे हात-पायांच्या तळव्यांना पिवळसरपणा दिसतो.
पायाचा संसर्ग
थायरॉईडच्या समस्येमुळे पायात इन्फेक्शन होते. याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पायांवर सूज येणे
पायांवर सूज येण्याची समस्या त्वचा संक्रमण, मधुमेह, किडनी खराब होणे आणि हृदयविकाराशी संबंधित समस्यांमुळे निर्माण होऊ शकते, पण ही समस्या हायपोथायरॉईडीझममध्ये दिसून येते.