Weather Forecast : संपूर्ण देशात आज मोठ्या थाटामाटात होळी साजरी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आज देशातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा हवामानाचा मूड बदलताना दिसत आहे.
रविवारी पंजाब, बिहारपासून दिल्लीपर्यंतगडगडाटासह हलका पाऊस दिसला. हवामान खात्यानुसार, आजही दिल्लीत दिवसभर ढगाळ वातावरण राहील. IMD च्या मते, सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
MVA मध्ये ‘या’ 4 जागांवरून रस्सीखेच, राहुल गांधी करणार चर्चा; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
आज दिल्लीत किमान तापमान 16 अंश आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते. यानंतर 26 मार्चला दाट ढगही दिसू शकतात. राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर येथेही हवामानातील बदल पाहायला मिळतात. कडक उन्हामुळे लोकांची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागनुसार, 25 आणि 26 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. 25 मार्च रोजी बिहार आणि झारखंडच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद होऊ शकते.
नागरिकांनो, 31 मार्चपूर्वी ‘ही’ कामे पूर्ण करा, पुन्हा मिळणार नाही संधी
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 25 मार्च रोजी पंजाबमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. पाटण्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. कोलकातामध्ये होळीच्या दिवशी ढगाळ वातावरण राहू शकते. हवामान खात्यानुसार, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये 26 ते 28 मार्चदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.