नवी दिल्ली – राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) जसजशी जवळ येत आहे तसे देशातील राजकीय पारा चांगलं तापत आहे. यातच राज्यसभा निवडणुकीत राजस्थान (Rajasthan) आणि महाराष्ट्र (Maharashtra) यांच्यातील लढत आता रंजक बनली आहे.
प्रथम राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर, राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात असल्यामुळे 10 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग (Cross voteing) होण्याची भीती आहे. भाजपने (BJP) आपल्या सर्व आमदारांना जयपूरला बोलावले आहे. दुपारपर्यंत भाजप आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. सुभाषचंद्र यांच्या आगमनाने तिसर्या जागेसाठी लढत होत आहे. त्याचबरोबर काँग्रेसही (Congress) सावध आहे. काँग्रेसमध्ये सहभागी असलेले बसपाचे (BSP) सर्व माजी आमदार उदयपूरला जाणार आहेत.
त्याचवेळी राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात तयारी जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अपक्ष आणि छोट्या पक्षांशी चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या (MVA) वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. आठ जूनपर्यंत महाविकास आघाडीचे आमदार हॉटेलमध्ये स्थलांतरित होतील. घोडेबाजार होऊ नये म्हणून आमदार हॉटेलमध्ये राहणार आहेत.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
भाजपने काही हॉटेल्समध्ये रूम बुक केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. महाविकास आघाडीचे नेते कोणकोणत्या हॉटेल्समध्ये बुकिंग झाले आहेत आणि त्याआधारे ते तिथे जाणार नाहीत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 3-4 अपक्ष आमदारांना भाजपकडून केंद्रीय यंत्रणांमार्फत धमकावले जात असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे येत्या 10 जूनला काय होणार हे पाहावे लागेल.