Upcoming Smartphone : मस्तच! पुढच्या आठवड्यात लाँच होणार ‘हे’ स्टायलिश फोन, शानदार फीचरसह किंमत असेल…

Upcoming Smartphone : पुढील आठवड्यात वनप्लस आणि मोटोरोचे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अप्रतिम फीचर्स पाहायला मिळतील. जाणून घ्या फीचर्स.

OnePlus Nord CE 4 Lite

OnePlus चा हा फोन भारतात 24 जून रोजी लॉन्च होणार असून हे लक्षात घ्या की फोन Oppo K12x चे रीब्रँडेड व्हर्जन असू शकते. या फोनमध्ये तुम्हाला 120Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले पाहायला मिळेल. तर या कंपनीचा हा आगामी फोन स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटने सुसज्ज असणार आहे. तर फोटोग्राफीसाठी, तुम्हाला फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा पाहायला मिळेल. या फोनची बॅटरी 5500mAh असेल, जी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

OnePlus S3 Pro

कंपनीचा हा फोन 27 जून रोजी चीनमध्ये लॉन्च होणार असून या फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तर कंपनी फोनमध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देईल. या फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेल (Sony LYT-800) असेल. तर या 24 GB पर्यंत रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज असलेल्या फोनची बॅटरी 6100mAh असेल, जी 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

Moto Razr 50 Series आणि Moto S50 Neo

मोटोरोला 25 जून रोजी आपली Moto Razr 50 सिरीज जागतिक स्तरावर लॉन्च करणार असून कंपनीच्या नवीन सीरिजमध्ये दोन फोनचा समावेश असणार आहे – Razor 50 आणि Razor 50 Ultra. तुम्हाला Razer 50 Ultra मध्ये 6.9 इंचाचा मुख्य डिस्प्ले तर 4 इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळेल. Razer 50 मध्ये तुम्हाला 6.9 इंच मेन आणि 3.6 इंच कव्हर डिस्प्ले मिळेल.

सीरिजमधील अल्ट्रा व्हेरिएंट स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 ने सुसज्ज असून व्हॅनिला व्हेरिएंट डायमेंशन 7300X चिपसेटसह सुसज्ज असणार आहे. Moto S50 Neo मध्ये 6.6 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असून ती 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Leave a Comment