Stock Market: 10 वर्षांत ‘या’ स्टॉकने दिला 1200 टक्के परतावा; 1.2 लाखांची झाली कमाई

Stock Market: जर तुम्ही देखील शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो, गेल्या 10 वर्षात चप्पल आणि शूज यांसारखी उत्पादने बनवणाऱ्या रिलॅक्सो फुटवेअरच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या स्टॉक ने गेल्या 10 वर्षांत बंपर परतावा दिला आहे. आकडेवारीनुसार, गेल्या दशकात या शेअरने 1200 टक्के परतावा दिला आहे.

ईटी मार्केटच्या विश्लेषणानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते, तर आज त्याला सुमारे 1.2 लाख रुपये परतावा मिळाले असते. Relaxo Footwear स्टॉकच्या अलीकडील कामगिरीवर नजर टाकल्यास, गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकने सुमारे 13 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या 3 महिन्यांत हा स्टॉक नऊ टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

ग्राहकांना लक्ष द्या! मार्चमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद, कारण जाणुन घ्या

जर आपण Relaxo स्टॉकच्या तांत्रिक गोष्टी पाहिल्या तर विश्लेषक म्हणतात की स्टॉक सध्या कमकुवत RSI दर्शवित आहे, जे कमी कामगिरीचे स्पष्ट सूचक आहे. अरिहंत कॅपिटलचे मिलेन वासुदेव सांगतात की, सध्या स्टॉकमध्ये लोअर टॉप लोअर बॉटम फॉर्मेशन दिसत आहे.

मराठा संघटनेकडून मोठी घोषणा! आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ….

स्टॉकला 800 ते 820 रुपयांच्या पातळीवर चांगला सपोर्ट झोन मिळत आहे. त्यामुळे शेअरमध्ये संभाव्य बाउन्स बॅक दिसू शकतो. जो 860 ते 880 रुपयांच्या पातळीवर असू शकतो. अशा प्रकारे कोणीही हा स्टॉक रु. 800 च्या स्टॉप लॉससह ठेवू शकतो.

कंपनीबद्दल माहिती

Relaxo Footwear Company 1984 पासून बाजारात आहे. कंपनीची भारतीय बाजारपेठेतील शीर्ष कंपन्यांपैकी एक म्हणून ओळख आहे. कंपनी कॅज्युअल आणि स्पोर्ट्स शूज बनवते, याशिवाय चप्पल आणि सँडल देखील बनवते.

Leave a Comment