Hyundai Cars Discount: भारतात आता सणासुदीच्या हंगाम सुरू झाला आहे. या सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय बाजारात एकापेक्षा एक भन्नाट डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात येत आहे.
यातच जर तुम्ही देखील या सणासुदीच्या हंगामात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे जाणुन घ्या ऑटो कंपनी Hyundai Motors ने तिच्या काही लोकप्रिय कार्सवर भन्नाट डिस्काउंट दिला आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही कमी किमतीमध्ये नवीन कार खरेदी करू शकता. चला मग जाणून घेऊया कंपनी ऑक्टोबर 2023 कोणत्या कार्सवर किती डिस्काउंट देत आहे.
Hyundai i20 N Line
भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी कंपनीने Hyundai i20 N Line लॉन्च केली आहे. सध्या कंपनी ऑफर अंतर्गत या कारवर 10,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.कंपनीने ही कार 9.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉन्च केली आहे.
Hyundai Grand i10 Nios
कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी Hyundai Grand i10 Nios एक आहे. बाजारात या कारला मोठी मागणी आहे. तुम्हाला ऑफर अंतर्गत ही कार खरेदीवर 43000 रूपयांची सूट मिळू शकते. बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 5.84 लाख रुपये आहे.
Hyundai Aura
बोल्ड लुकसह येणारी Hyundai Aura तुम्ही या ऑफर अंतर्गत 33,000 रुपयांचे डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
ही कार मारुती सुझुकी डिझायर, टाटा टिगोर आणि होंडा अमेझ सारख्या कारशी स्पर्धा करते.
Hyundai Venue
काही दिवसांपूर्वी कंपनीने बाजारात एक्स-शोरूम किंमत 10.96 लाख रुपयांमध्ये ही कार लॉन्च केली आहे.ऑक्टोबर 2023 मध्ये तुम्हाला या कारवर 25,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
Hyundai Alcazar
जबरदस्त फीचरसह कंपनीची 7-सीटर SUV Hyundai Alcazar बाजारात मोठया प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तुम्हाला या कारवर 20,000 रुपयांची सूट मिळेल.