मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करीत आहेत.. या संपाला एक महिन्याहून अधिक काळ उलटला असला, तरी एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. मात्र, आता त्यांचाही संयम सुटत चालला आहे. त्यात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी आज शेवटची संधी देण्यात आली आहे. आता जर ते कामावर रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्यापूर्वी त्यांची शारीरिक व मानसिक आरोग्य चाचणी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला दिला आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मुद्दावर एसटी कर्मचारी आजही ठाम आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आधी संपातून बाहेर पडले. त्यानंतर हळुहळू एसटी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी संपातून माघार घेतली. मात्र, काही कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज (ता. 23) अंतिम मुदत दिली आहे. मात्र, जर आजही ते कामावर रुजू न झाल्यास, उद्यापासून (ता. 24) त्यांच्यावर कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.. नियमानुसार कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फीसारख्या कारवाईला उद्यापासून सुरुवात होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
एसटीच्या विलिनीकरणासाठी कर्मचारी ठाम असून, हा तिढा सुटलेला नाही. न्यायालयानेही हा संप बेकायदेशीर असल्याचे म्हटलंय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महामंडळाने इशारा दिला आहे. दरम्यान, कारवाई होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचे आवाहन महामंडळाने केलं आहे.
आदित्य ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी, आरोपी निघाला सुशांतसिंहचा चाहता…
रिलेशनशिप टिप्स : नवीन वर्षात या चार सवयी सोडा.. जोडीदाराशी नात्यात राहील गोडवा