मुंबई – आयपीएलच्या 15व्या (IPL 2022) हंगामाचा प्रवास वेगाने सुरू आहे. आज दुहेरी हेडर म्हणजेच लीगमध्ये दोन सामने खेळवले जात आहे. दिवसाचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लीगचा नवा संघ गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ मोसमातील दुसरा सामना खेळणार आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता, तर गुजरातने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली लखनौचा पराभव केला होता. दोन्ही संघांना त्यांची विजयी मोहीम पुढे नेण्याची इच्छा आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात काय होऊ शकते ते जाणून घेऊया.
Ngidi ला संधी मिळू शकते
दिल्ली आणि गुजरात या दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने जिंकल्यामुळे त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होण्याची आशा नाही. दिल्लीची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत असून संघ संतुलित दिसत आहे. मात्र या सामन्यासाठी लुंगी एनगिडी आणि मुस्तफिजुर रहमान यांची सेवा दिल्लीला उपलब्ध असेल. लुंगीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या पुनरागमनामुळे दिल्लीच्या गोलंदाजीला अधिक धार मिळेल
त्यांच्या गोलंदाजीच्या तुलनेत गुजरातची फलंदाजी थोडी कमकुवत दिसते. शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांच्याकडून संघाला दमदार सुरुवातीची अपेक्षा असेल. संघात काही बदल झाल्यास विजय शंकर यांना बाहेर बसावे लागू शकते.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
संभाव्य Playing 11
दिल्ली कॅपिटल्स:
पृथ्वी शॉ, टिम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, लुंगी अँगिडी.
गुजरात टायटन्स:
शुभमन गिल, मॅथ्यू वेड (wk), विजय शंकर/वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, वरुण आरोन.