Best Phones Under 10000 : होणार फायदा, मस्त फीचर्ससह घरी आणा 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत ‘हे’ 5G फोन

Best Phones Under 10000 : सध्या देशात 5G फोनची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. या फोनमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स मिळत असल्याने बाजारात या फोनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या फोनची किंमत थोडी जास्त असल्याने अनेकजण नवीन 5G फोन खरेदी करत नाही.

मात्र आता तुम्हाला अगदी स्वस्तात नवीन 5G फोन खरेदी करता येणार आहे. होय , ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइट Amazon 5G फोनवर शानदार डील ऑफर करत आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये नवीन 5G फोन खरेदी करू शकता. चला मग जाणून घेऊया तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये कोणत्या कोणत्या नवीन 5G फोन घरी आणू शकता.

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ नियम; जाणून घ्या खिशावर काय होणार परिणाम

Redmi 13C 5G

Redmi 13C 5G तुम्ही आता स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनचा 4GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिएंट तुम्हाला 10,999 रुपयांना खरेदी खरेदी करता येणार आहे. ऑफर अंतर्गत तुम्हाला या फोनवर 1000 रुपयांची इंस्टेंट सूटही दिली जात आहे. त्यानंतर त्याची किंमत फक्त 9,999 रुपये होते. तुम्हाला या फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले आहे. जे MediaTek Dimensity 6100+ चिपसेटमध्ये 50MP ड्युअल कॅमेरा सेटअपसह येते. जे 5000mAh बॅटरीसह विशेष फीचर्ससह येते.

TECNO Spark 20C  

TECNO Spark 20C देखील तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय सिद्ध ठरू शकते. सेलमध्ये या फोनच्या 16GB RAM/128GB स्टोरेजची किंमत फक्त 8,999 आहे. मात्र या या किंमतीनंतरही, तुम्हाला 1000 रुपयांची इंस्टेंट सूट मिळते. यानंतर तुम्ही हा फोन फक्त  7,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा येतो. जे 8MP फ्रंट कॅमेरासह 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते.

सावधान, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, विदर्भात गारपीटीची शक्यता; जाणून घ्या ताजे अपडेट

Samsung Galaxy M14 5G

Amazon सेलमध्ये तुम्ही स्वस्तात Samsung Galaxy M14 5G फोन खरेदी करू शकता. सेलमध्ये तुम्हाला हा फोन 9,990 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन 6000mAh च्या पॉवरफुल बॅटरीसह येते. हे डिव्हाइस 4GB RAM/128GB स्टोरेजसह येते. जो 6.6 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मध्ये येतो. तसेच, यात Exynos 1330 प्रोसेसर आहे. जो 13MP फ्रंट कॅमेरा सह येतो.

Leave a Comment