Cars Under 5 Lakh : महागाईत घरी आणा स्वस्तात मस्त कार! 5 लाखात मिळणार ‘ह्या’ जबरदस्त कार्स

Cars Under 5 Lakh :  जर तुम्ही वाढणाऱ्या या महागाईत स्वस्तात मस्त कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी या लेखात आम्ही अवघ्या 5 लाखात खरेदी करता येणाऱ्या कार्सची माहिती देणार आहोत.

या कार्समध्ये तुम्हाला एकापेक्षा एक मस्त मस्त फीचर्स आणि दमदार इंजिन देखील कंपनीकडून ऑफर करण्यात आलं आहे. यामुळे सध्या बाजारात या कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. चला मग जाणून घ्या 5 लाखात खरेदी करता येणाऱ्या कार्सची सविस्तर माहिती.

Cars Under 5 Lakh : 

Maruti Alto K10

देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात मस्त कार्स विकत आहे. तुम्ही या कंपनीची Maruti Alto K10 स्वस्तात खरेदी करू शकता. या कारचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी फक्त 5.90 लाख रुपयांची गरज आहे. तर तुम्हाला CNG व्हेरियंट खरेदी करण्यासाठी 5.73 लाख ते 5.96 लाख रुपयांची आवश्यकता आहे.

MG Astor फक्त 5 लाखात! खरेदीसाठी जमली गर्दी; पहा ‘ही’ अप्रतिम ऑफर

Renault Kwid

तर दुसरीकडे तुम्ही स्वस्तात मस्त खरेदीसाठी Renault Kwid चा देखील विचार करू शकता. बाजारात या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.69 लाख रुपये आहे तर टॉप व्हेरियंटसाठी 6.44 लाख रुपये मोजावे लागते. याचे ऑटोमॅटिक व्हेरियंट 3 पर्यायांसह बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्यांची किंमत  6.12 लाख रुपये आहे.

Maruti Alto

Maruti Alto K10 सह तुम्ही मारुती सुझुकीची Maruti Alto देखील खरेदी करू शकता. बाजारात या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.54 लाख रुपये आहे. कंपनीने त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.13 लाख रुपये ठेवली आहे. तुम्हाला ही कार सॉलिड व्हाइट कलर, मोजिटो ग्रीन, अपटाउन रेड, सिल्की सिल्व्हर, ग्रेनाइट ग्रे आणि सेरुलियन ब्लू कलरमध्ये खरेदी करता येणार आहे.

पॅलेस्टिनींवर कहर! जेवणासाठी उभे असणाऱ्या लोकांवर इस्रायली सैनिकांचा गोळीबार; 20 ठार

Maruti S-Presso

Maruti Alto आणि Maruti Alto K10 सह तुम्हाला मारुती सुझुकीची आणखी एक कार स्वस्तात खरेदी करता येते. तुम्हाला कंपनीची Maruti S-Presso  4.26 लाखात खरेदी करता येते. (किंमत एक्स शोरुम) तर या कारचे टॉप व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6.05 लाख रुपये लागणार आणि CNG व्हेरियंटसाठी  5.91 लाख ते 6.11 लाख रुपये खर्च येणार.

Leave a Comment