UPI Update: गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात यूपीआय पेमेंट झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज अनेक जण घरी बसूनच जेवणाची व्यवस्था करताना दिसत आहे तसेच शॉपिंग करत आहे. तर काहीजण आर्थिक व्यवहार देखील यूपीआय पेमेंटने करत आहे.
यातच जर तुम्ही देखील यूपीआयने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार 4 ऑगस्ट 2024 रोजी यूपीआयने तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. होय, HDFC बँक ग्राहकांना 4 ऑगस्ट 2024 रोजी यूपीआयने पेमेंट करता येणार नाही.
याचा कारण म्हणजे शेड्यूल डाउनटाइम अलर्ट बँकेने जारी केला आहे. या कालावधीत, ऑनलाइन पेमेंट बंद केले जाईल, परंतु यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आली आहे.
बँक सूचना
बँकेने अधिसूचना जारी केली आहे. सकाळी 12:00 ते पहाटे 03:00 पर्यंत सिस्टम मेंटेनन्सचे काम केले जाईल आणि या दरम्यान सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहतील, असे सांगण्यात आले आहे. म्हणजे एकूण 180 मिनिटांसाठी असे पेमेंट थांबवले जाईल. याचा परिणाम सर्व खातेदारांवर होणार आहे. यामध्ये बचत आणि चालू खातेधारक दोन्ही व्यवहार करू शकणार नाहीत.
कोणत्या ॲप्सवर परिणाम होईल?
मात्र, याचा परिणाम सर्व ॲप्सवर होणार आहे. ज्याच्या मदतीने युजर्स UPI पेमेंट करतात. अधिसूचनेनुसार, तुम्ही HDFC मोबाइल बँकिंग ॲप, GPay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobikwik वर पेमेंट करू शकणार नाही. म्हणजे एका अर्थाने सिस्टीम पूर्णपणे डाऊन होईल. परंतु पीओएसच्या मदतीने केलेल्या व्यवहारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
काय करावे लागेल?
UPI पेमेंट डाउन असताना तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. याची सुरुवात एचडीएफसी बँक स्वतः करणार आहे. मेंटेनन्सदरम्यान बँकांकडून हे अनेकदा केले जाते.
एचडीएफसी बँकेशिवाय, इतर अनेक बँका देखील मेंटेनन्स करतात आणि या दरम्यान बर्याच गोष्टींची काळजी घेतली जाते. वास्तविक हे नेटवर्क वाढवण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी केले जाते.