Personal Loan : जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर कारणाने तुमच्या पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो ही बातमी तुमच्या कामाची आहे.
या लेखात आम्ही तुम्हाला कमी व्याज दराने कर्ज देणाऱ्या बँकांची माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत अगदी कमी व्याज दरात कर्ज घेऊन तुमच्या पैशांची गरज पूर्ण करू शकतात.
Bank Of Maharashtra
बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांना 10 ते 12.80% व्याजदराने वैयक्तिक कर्ज देत आहे. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला एकूण कर्जाच्या रकमेच्या 1% आणि प्रक्रिया शुल्क म्हणून GST भरावा लागेल.
HDFC Bank
HDFC बँक आपल्या ग्राहकांना 10.50% ते 24% व्याजदराने वैयक्तिक कर्ज देत आहे. हे कर्ज घेताना तुम्हाला 4,999 रुपये प्रोसेसिंग फी देखील भरावी लागेल.
SBI Bank
SBI ने 11% ते 14% व्याज दराने वैयक्तिक कर्ज देत आहे. कर्ज घेताना तुम्हाला तुमच्या कर्जाच्या रकमेवर एकूण रकमेच्या 1.50% किंवा रु. 1,000 ते रु. 15,000 दरम्यान सर्वात कमी प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागेल.
Canara Bank
कॅनरा बँक 10.65% ते 16.25% व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देत आहे. या बँकेची एक खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.