FD Rate: महागाईत होणार बंपर बचत! ‘ह्या’ 5 बँका देणार एफडीवर जास्त व्याज; जाणुन घ्या नवीन दर

FD Rate: देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करून बँकेमध्ये एफडी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही आज देशातील काही बँकाबद्दल माहिती देणारा जे तुम्हाला एफडीवर जास्त व्याजदर देत आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या बँका तब्बल नऊ पेक्षा जास्त टक्क्यांनी एफडीवर व्याज देत आहे. चला मग जाणून घेऊया कोणत्या बँका तुम्हाला एफडीवर किती व्याजदर देत आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना जन स्मॉल फायनान्स बँक 3.50 ते 9 टक्के व्याजदर देते. तर 365 दिवसांच्या कालावधीसह एफडीवर सर्वाधिक व्याज लाभ उपलब्ध आहे. या दिवसांसाठी ग्राहकांना एफडीवर 9 टक्के व्याज मिळते.

ग्राहकांना एफडीवर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक देखील जबरदस्त परतावा देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे कालावधीच्या एफडीवर 4.60% ते 9.10% पर्यंत व्याजाचा लाभ देत आहे. तर 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक परतावा 9.10 टक्के आहे.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 4.60% ते 9.10% व्याज देखील देते. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर व्याज उपलब्ध आहे. त्याच वेळी, 2 वर्षे आणि 2 दिवसांच्या एफडीवर 9.10 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर 3.60 टक्के ते 9.21 टक्के व्याजदराचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनाही मिळेल. 750 दिवसांच्या मुदतीसह एफडीवर 9.21 टक्के कमाल व्याज लाभ मिळेल.

SBI बँकेत खाते असेल तर ‘ही’ बातमी वाचा नाहीतर …..

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 4.50 ते 9.50 टक्के व्याज देते. 1001 दिवसांत एफडीवर 9 टक्के व्याज दरासह सर्वाधिक परतावा देतात.

Leave a Comment