Ahmednagar Lok Sabha 2024 : … म्हणून परवेज अशरफी यांना थेट पाकिस्तानातून धमकी! पहा उमेदवारी मागे घेतल्यावर काय घडले प्रकरण

Ahmednagar Lok Sabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आतापर्यंत देशात दोन टप्प्यात लोकसभेसाठी मतदान झाले आहे तर आता सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात आणि 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचा मतदार पार पडणार आहे.

13 मे रोजी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील मतदान होणार आहे. सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राज्याचे राजकारणात चांगलं चर्चेत आलं आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीम पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी निवडणूक अर्ज भरला होता व अर्ज माघार घेण्याचे शेवटच्या क्षणी अचानक कोणाला याची कल्पना नसतांना अर्ज मागे घेतला.

 डॉ परवेज अशरफी यांना संपर्क केले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देत असे स्पष्टीकरण दिले की देशात सध्या जे वातावरण निर्मिती करण्यात आली आहे त्यावरून असे दिसते की सध्याची सरकार आणि त्यांचे संघटन यांना संविधान बदलायचा आहे. आणि हे वक्तव्य वारंवार माध्यमातून येत आहे. जर संविधान बदलले गेले तर लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही येईल. त्यामुळं सध्या संविधान वाचवणे ही गरज असून त्यासाठी जे शक्य आहे ते करावे लागेल. त्याच बरोबर समाजात माझा अर्ज दाखल झाल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया येत होती.समाजातील बुध्दीजीवी वर्गाचे म्हणणे होते की मी उमेदवारी मागे घ्यावी. त्यासाठी बरयाच लोकांनी माझ्याशी फोनवर व समक्ष चर्चा ही केली.

शेवटच्या क्षना पर्यंत विचार केल्या नंतर मला असे वाटले की सध्या संविधान वाचविण्यासाठी संपूर्ण समाज प्रयत्न करत आहे. तर आपणही त्यांच्या बरोबर उभे राहणे गरजेचे असून आपल्या मुळे या जातीवादी पक्षाचा उमेवार निवडून येता कमा नाही. त्यासाठी मला एकच पर्याय दिसला म्हणजे अर्ज मागे घेणे ते मी देश आणि समाज हिता साठी केले असल्याचे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

उमेदवारी मागे घेतल्याने डॉ परवेज अशरफी यांना पाकिस्तानातुन धमकी

अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी अर्ज मागे घेतला असल्याने त्यांना पाकिस्तानातुन एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्स ॲप कॉल आले आणि धमकी दिली की “तू और तेरे साथ वाले दीन गिनाना चालू करदे ” तो नंबर पाकिस्तानचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर नंबर व अनोळखी व्यक्ती विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment