Petrol Price : नेहमीप्रमाणे आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Price) जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र (Maharashtra) वगळता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह सर्व राज्यांमध्ये सलग 80 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याच वेळी, कच्च्या तेलाच्या (Crude Oil ) किमती अजूनही प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आहेत. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 96.40 पर्यंत खाली आले आहे, तर WTI प्रति बॅरल $ 90.49 वर आहे. असे असतानाही पेट्रोल आणि डिझेल अद्याप स्वस्त झालेले नाही.
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT) कमी केल्यानंतर आता देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या (Rajasthan) श्री गंगानगरमध्ये आहे. याआधी महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल उपलब्ध होते. आज पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. श्री गंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे.
महागाई (Inflation) वाढल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पेट्रोलियम कंपन्यांना एकूण 18,480 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तीन सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल-जून तिमाहीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न वाढल्यामुळे त्यांच्या तोट्यात लक्षणीय वाढ झाली आहे. हे त्यांच्या विपणन मार्जिनमध्ये घट झाल्यामुळे होते. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊनही त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळण्याची शक्यताही कमीच दिसत आहे. कंपन्या सध्या त्यांचे नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नात आहेत.