Petrol Price : पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) नवे दर जाहीर केले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातून जनतेला सातत्याने दिलासा मिळत आहे. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT) कमी केल्यानंतर आता देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे. याआधी महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Parbhani) सर्वात महाग पेट्रोल उपलब्ध होते. आज पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे. श्री गंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे. पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.04 रुपये आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. परभणीत पेट्रोल 114.42 रुपये तर डिझेल 98.78 रुपये दराने विकले जात आहे. श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.49 रुपये आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
दरम्यान, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर कमी होत आहेत. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.