Ajit Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठेक पार पडली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील दुष्काळ स्थितीवर तसेच पुणे कार अपघात प्रकरणावर भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणाले, देशात सध्या सहा टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे तर सातव्या टप्प्याचा मतदान बाकी आहे. आम्ही सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाला आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही.
राज्यात पाण्याच्या टँकरची मोठी मागणी आहे यामुळे आम्ही आचारसंहिता भंग होऊ नये याचा विचार करून राज्यात टँकर उपल्बध करून देत आहोत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आम्ही 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करत शिक्षण शुल्क माफ केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या राज्यातील काही भागात पाण्याची टंचाई भीषण आहे. मुंबई सारख्या भागात आम्ही 5 टक्के कपात केली आहे मात्र हीच परिस्थिती राहिली तर मुंबईत आम्ही 10 टक्के पाणी कपात करण्याचा विचार करून अशी माहिती त्यांनी यावेळी दिली तसेच वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी पत्रे उडून गेले आहेत तर काही ठिकाणी वीजा पडल्या आहेत यामुळे जीवित हानी झाली त्या सर्वांचे पंचनामे सुरू आहेत असं देखील अजित पवार म्हणाले.
तर पुणे कार अपघात प्रकरणात बोलताना अजित पवार म्हणाले, पालकांनी दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आणि दोन मुलांना काही दोष नसताना जीव गमवावा लागला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आरोप अल्पवयीन मुलावर, त्याच्या वडिलांवर आणि आजोबांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांना जे कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.