मुंबई – भारतीय क्रिकेट संघाने (Team India) बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा (Sri lanka) 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला आहे.
भारतीय संघाच्या विजयासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फायदा झाला आहे. टीम इंडिया आता एका स्थानाचा फायदा घेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताला अजून सात सामने खेळायचे असून, पुढील वर्षी होणाऱ्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या संघाच्या आशा कायम आहेत. भारताने उर्वरित सामने जिंकले तर ते सलग दुसऱ्यांदा कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतात. याआधी 2021 मध्येही भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल खेळली होती, पण त्यानंतर न्यूझीलंडकडून (New Zealand) पराभव स्वीकारावा लागला होता.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
गुणतालिकेत भारताचे स्थान
ताज्या आकडेवारीनुसार भारत सध्या ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेनंतर चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत एकूण चार मालिका अंतर्गत 11 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी सहा जिंकले आहेत. त्याच्या विजयाची टक्केवारी 58.33 वर गेली आहे.
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचे सात सामने बाकी आहेत
कसोटी चॅम्पियनशिपचा दुसरा अंतिम सामना 2023 मध्ये खेळवला जाईल. याआधी भारताला सात सामने खेळायचे आहेत. यातील सहा सामने आशिया खंडात खेळवले जाणार आहेत. भारत इंग्लंडमध्ये एक कसोटी, बांगलादेशमध्ये दोन कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात चार कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंडमधील एकमेव कसोटी वगळता इतर सर्व सामने जिंकणे भारतासाठी सोपे जाईल. ऑस्ट्रेलियन संघ आव्हान देऊ शकतो, पण भारताच्या फिरकी खेळपट्टीवर भारतीय संघाचा नेहमीच वरचष्मा असतो.