Sanjay Raut : निवडणुकीनंतर राज ठाकरे नावाची दुकान बंद होणार, संजय राऊतांची टीका

Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यातील प्रचारासाठी अवघ्या काही तास शिल्लक आहे. यामुळे महायुतीकडून प्रचारासाठी जोर लावला जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये महायुतीची जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे.

या सभेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी राज ठाकरेसह अन्य महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार त्यातील राज ठाकरे एक दुकान आहेत असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

संजय राऊत पुढे म्हणाले, तीन-चार सुपारी शोप इन पॉलिटिक्स बंद होणार आहे.त्यातीलच एक हे दुकान आहे.

तर आज होणाऱ्या महायुतीच्या सभेवरुन देखील त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात कोणीही येऊ दे, जितक्या सभा घेतील तितक्या त्यांच्या सीट कमी होतील. प्रधानमंत्री मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात म्हणजे तुम्ही दहा वर्षात काही केलं नाही म्हणून येत आहात. असं देखील संजय राऊत म्हणाले.

ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या त्यांना मांडीवर घेऊन बसावे लागत आहे. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात, त्यांच्याबरोबरच जातात ही राज ठाकरे यांची खासियत आहे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लावला.

तर महाविकास आघाडीच्या सभेबद्दल माहिती देताना संजय राऊत म्हणाले, आज संध्याकाळी महाविकास आघाडीची सभा आहे. शिवतीर्थावर सभा व्हावी यासाठी आम्ही प्रथम अर्ज केला. मात्र, आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्री आणि सुपारीबाज बोलवण्यात आले.

 हा सत्तेचा गैरवापर आहे. पण ठीक आहे बीकेसीमध्ये सभा होणार आहे. या सभेला मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Comment