The Politics News: पुणे (Pune): भाजपने (BJP) बारामती (Baramati) लोकसभा (Loksabha) मतदारसंघाकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. या लोकसभा मतदारसंघातील खडकवासला (Khadakwasla) विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळतं. त्यामुळे आता खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील खडकवासल्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणी त्यांनी नागरी समस्यांच्या विरोधात आंदोलन (Civic Issue Protest) करून भाजपच्या मतदारसंघातील असुविधा समोर आणून टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नऱ्हे (Narhe) गावातील वेताळ बाबा चौक येथे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ईडी सरकारच (ED Government) करायचं काय?, खाली डोके वर पाय, पन्नास खोके नॉट ओके, बेरोजगार तरुणांना धोके, वेदांत प्रकल्प गुजरातला (Gujarat) पाळविणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा (Shinde Fadanvis Government) धिक्कार असो, पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, खड्डे, कचरा, पाणी, ड्रेनेज या सुविधा त्वरीत दिल्याच पाहिजेत अशा घोषणा देण्यात आल्या. खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण,त्रिंम्बक मोकाशी, माजी सभापती प्रभावती भुमकर, माजी सरपंच पोपटराव खेडेकर, माजी उपसरपंच राजाभाऊ वाडेकर, राजश्री पाटील, सुप्रिया भुमकर, ललिता कुटे, नारायण इंगळे, दशरथ वाल्हेकर, नुरशेठ सय्यद, नगरसेविका सायली वांजळे, स्मिता कोंढरे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,समाविष्ट गावातील कचरा, पाणी, रस्त्यावरील खड्डे ,टॅक्स व सर्व प्रश्नांसाठी आपला कचरा, पाण्याचे हांडे घेऊन महापालिकेवर धडक देऊन जन आक्रोश आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री असताना दर शुक्रवारी सर्व प्रश्न मार्गी लागायचे. त्यावेळी काही निधीही पडला होता.परंतु या सरकारने तो निधी थांबला आहे. पालकमंत्री नसल्याने या सरकारला शहराची चिंता राहिलेली नाही. त्यामुळेच समस्या गंभीर होत आहेत.
- Must Read :
- Pune News Today: पटोलेंचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान; पहा कशाचा हिशोब मागितला ते
- Pune news today: लोकमान्य टिळकांचे दुसरे वारसदारही भाजपमध्ये जाणार?
- Pune: शिंदे-फडणवीस सरकारने दिले लॉलीपॉप; राष्ट्रवादीचे दणक्यात आंदोलन