The Politics News: पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये (Pune Municipal Corporation election) महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) हे तीन पक्ष एकत्र येतील असा दावा केला जात आहे. असे असताना आता मात्र काँग्रेसने बैठक बोलवून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच हिसका दिला आहे. आगामी पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवायची असा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आगामी निवडणुकीत पर्यंत काँग्रेसची भूमिका कायम राहते का याकडेही लक्ष लागले आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक काँग्रेस भवन (Pune Congress Bhavan) येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (City president Arvind Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये (core committee meeting) पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा (PMC election discussion) देखील झाली. पुणे महापालिकेची निवडणूक ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या पाच वर्षात भाजपची BJP एखादी सत्ता असताना शहरात काँग्रेसचे फक्त दहा नगरसेवक होते. राज्यात महाविकास आघाडी (mahavikas Aghadi) झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन पालिका निवडतील अशी भूमिका घेण्यात आली. या तिन्ही पक्षांची एकत्र बैठकसुद्धा झालेली होती. पुणे महापालिकेत साधारणता 170 जागा असण्याची शक्यता आहे. त्यापैकी शंभर जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच दावा केलेला आहे. उरलेल्या 70 जागांमध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष लढवावी लागणार आहेत. काँग्रेसला ही भूमिका पूर्वीपासूनच मान्य नाही. तिन्ही पक्षांमध्ये समसमान जागावाटप (seat distribution formula) झाले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.
तसेच महापालिका निवडणुकीत फक्त तीस ते पस्तीस जागा काँग्रेसने लढविल्यास लोकसभा (Loksabha) निवडणुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. कार्यकर्त्यांचे संपर्क संघटन आणि नागरिकांचा संपर्क तुटू शकतो असा धोका काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पूर्वीपासून काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवावी याच भूमिकेचे आहेत. मात्र काँग्रेसमधील एक गट असा आहे की त्यांना राष्ट्रवादीसोबतच आघाडी करून निवडणूक लढवावी असे वाटते. त्यामुळे या नेत्यांचे निकटवर्तीय व कुटुंबातील सदस्य आरामात निवडणूक लढवून महापालिकेत जाऊ शकतात. त्यामुळे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचाही कार्यकर्त्यांचा आरोप आहे. काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती असताना काँग्रेस भवन मध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर स्थिती बदलली आहे. काँग्रेसला लोकांपर्यंत पोहचायचे असेल तर स्वबळावरच निवडणूक लढवली गेली पाहिजे अशी मागणी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची केली. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणी नुसार येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी असे आदेश बैठकीत देण्यात आले.
“काँग्रेसच्या पदाधिकार्यांची बैठक काँग्रेस भवन येथे पार पडली. त्यामध्ये सर्वांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. ”
– अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस