मुंबई – भारतीय संघाचा देशांतर्गत सीजन फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेने सुरू होत आहे. आता भारतीय खेळाडू आयपीएलनंतर जून महिन्यापर्यंत देशात क्रिकेट खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पुढील महिन्यात क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघ 10 दिवस खेळताना दिसणार आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे, तीन टी-20 आणि श्रीलंकेविरुद्ध एक कसोटी सामना खेळायचा आहे.
पुढील पाच महिने भारतीय संघ आपल्याच देशात क्रिकेट खेळणार आहे. प्रथम भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर श्रीलंकेसोबत कसोटी आणि टी-20 मालिका होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएल सुरू होईल, जी मे महिन्याच्या अखेरीस संपेल. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ जूनमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. पाच महिन्यांनंतर, जुलैमध्ये भारत वेस्ट इंडिजला भेट देणार आहे.
फेब्रुवारीमध्ये भारताचे सामने
6 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ODI)
9 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ODI)
11 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ODI)
16 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (T20)
18 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (T20)
20 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (T20)
28 फेब्रुवारी – 04 मार्च, भारत विरुद्ध श्रीलंका (कसोटी)
युवा खेळाडूंना चांगली संधी
येत्या पाच महिन्यांत भारताला वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने खेळायचे आहेत. यादरम्यान भारताच्या अनेक युवा खेळाडूंना वनडे आणि टी-20 संघात संधी दिली जाईल. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात आपले स्थान निश्चित करण्यासाठी युवा खेळाडू या काळात चांगली कामगिरी करू शकतात. आवेश खान, हर्षल पटेल, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संधी दिली जाऊ शकते.