दिल्ली: दक्षिण दिल्लीतील (South Delhi) शाहीनबागमध्ये (Shaheen Bagh) , नागरिकत्व कायद्याच्या विरोधात 2019 मध्ये ज्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले होते त्या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यासाठी दक्षिण महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी आज बुलडोझर (Bulldozer) लावला होता. मात्र, अवैध बांधकाम न पाडताच बुलडोझर परत गेला. स्थानिक लोकांनी मोठ्या संख्येने एमसीडीच्या कारवाईचा निषेध केला आणि बुलडोझरसमोर रस्त्यावर बसले.
या धरणे आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाचे (AAP) कार्यकर्तेही तेथे जमले आणि त्यांनी एमसीडीच्या कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहून दिल्ली पोलीसही (Delhi police) हतबल झाले.लोकांनी एमसीडी आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली. अखेर अडीच तासानंतर बुलडोझर पुन्हा बरंग येथे गेला.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
जाणून घ्या – कधी काय झाले?
10:00 AM: MCD टीम शाहीन बाग जी ब्लॉक मार्केटमध्ये पोहोचली.
10:15 AM: एक बुलडोझर घटनास्थळी पोहोचला.
10:30 AM: CRPF जवानांसह दिल्ली पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली.
10:45 AM: काँग्रेस कार्यकर्ते बुलडोझरसमोर बसून निषेध.
11:00 AM: दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
11:15 AM: ओखला येथील आप आमदार अमानतुल्ला पोहचले, त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली.
11:30 AM: बुलडोझर एका मचानपर्यंत पोहोचला, ज्याचा वापर पेंटिंगसाठी केला जात होता.
12:00 PM: स्थानिक आमदार आणि मार्केट असोसिएशनने हस्तक्षेप केला आणि MCD ला शटरिंग काढण्याचे आश्वासन दिले.
12:30 PM: स्थानिक लोकांनी शटरिंग हटवले.
12:45 PM: बुलडोझर घटनास्थळावरून परत आला. एमसीडीचे अधिकारीही बाहेर आले.