मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा 33 वर्षीय स्टार फलंदाज विराट कोहलीने नुकताच कसोटी फॉरमॅटच्या कर्णधारपद सोडला आहे. कोहलीच्या या मोठ्या निर्णयानंतर संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला असून लोक आपापल्या पद्धतीने प्रतिक्रीया देत आहे. पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही त्याच्याबद्दलच्या आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोहलीने कर्णधारपद सोडलेले नाही, तर त्याच्यापासून मुक्त झाले आहे, असे मत माजी पाक वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. कोहली हा महान क्रिकेटपटू आहे आणि त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे. या दिग्गज गोलंदाजाचे मत आहे की, बहुतेकदा मोठे संकट मोठ्या लोकांवरच येतात. मी त्यांच्यासाठी दुःखी आहे. कोहलीने या परिस्थितीतून बाहेर पडावे. त्यांच्यासोबत जे झाले ते विसरून त्यांनी पुढे जावे.
यावेळी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाच्या पुढील कर्णधाराबद्दल खुलेपणाने चर्चा केली. याबाबत बीसीसीआय जो काही निर्णय घेईल तो चांगलाच निर्णय असेल असे ते म्हणाले. याशिवाय आगामी T20 विश्वचषक 2022 मधील भारत-पाक सामन्याबद्दलही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मेलबर्नमध्येही आम्ही भारताविरुद्ध जिंकू, असे तो म्हणाला. ग्रीन टीम टी-20 फॉरमॅटमध्ये भारतापेक्षा चांगली टीम आहे.
नुकताच ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हा विश्व कप 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. या दरम्यान या महाकुंभाचे सर्व सामने ऑस्ट्रेलियातील सात शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. ब्रिस्बेन, पर्थ, अॅडलेड, सिडनी, मेलबर्न, होबार्ट आणि जिलॉन्ग या शहरांमध्ये खेळली जाणार आहेत.
भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ आपला पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवाची परतफेडही त्यांच्या मनात असेल.