Thane Lok Sabha | शिंदेसेनेसाठी गुडन्यूज! कल्याणपाठोपाठ ‘हा’ मतदारसंघही मिळणार; पहा, कसं फिरलं राजकारण?

Thane Lok Sabha Constituency : महायुतीने राज्यभरात 39 मतदारसंघात उमेदवार (Thane Lok Sabha Constituency) निश्चित केले आहेत. परंतु 9 मतदारसंघातील तिढा मात्र अजूनही कायम आहे. या मतदारसंघात उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांना अजूनही घेता आलेला नाही. याचे कारण म्हणजे या मतदारसंघात प्रचंड धुसफूस निर्माण झाली आहे. उमेदवारी कुणाला द्यायची, मतदारसंघ कुणाकडे घ्यायचा याबाबत निर्णय घेता आलेला नाही. परंतु काही केले तरी या मतदारसंघातील तिढा सोडवणे क्रमप्राप्त आहे. आता त्या दृष्टीने महायुतीच्या नेत्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभेसाठी काही मतदारसंघात महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. यामध्ये मुंबईतील जागांचा समावेश प्रामुख्याने होतो. यापैकी कल्याणची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्याचा निर्णय भाजपने आधीच घेतला होता. त्यानंतर आता ठाण्याच्या जागेवरचा दावा देखील भाजपने सोडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कल्याणपाठोपाठ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघ देखील शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता फक्त याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी राहिले आहे.

Raigad Lok Sabha | बाब्बो..! रायगडमध्ये एकाच नावाचे 3 उमेदवार; पॉलिटिक्सच्या भन्नाट खेळीचा फटका कुणाला?

Thane Lok Sabha

मागील काही दिवसांपासून महायुतीत कल्याण आणि ठाणे या दोन लोकसभा मतदारसंघांवरून तिढा निर्माण झाला होता. कल्याण आणि ठाणे या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने दावा ठोकला होता. यामध्ये कल्याण मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. परंतु भाजपने या जागेवर दावा केल्याने पहिल्या उमेदवारांच्या यादीत श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करता आले नव्हते. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने दावा सांगितल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. याव्यतिरिक्त नाशिकमध्येही असाच तिढा पाहायला मिळतोय.

परंतु चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढू अशी वक्तव्य महायुतीच्या नेत्यांकडून केली जात होती. त्यानुसार बैठका आणि चर्चा सातत्याने होत होत्या. आता या प्रदीर्घ चर्चेनंतर कल्याणपाठोपाठ ठाणे मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला आहे. या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळविण्याची हमी शिंदेंनी दिल्याचे सांगितले जात आहे.

Thane Lok Sabha

या जागेसाठी भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आग्रही होते. त्यामुळे तिढा निर्माण झाला होता. या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू होत्या अनेक बैठका देखील झाल्या. परंतु सकारात्मक निर्णय घेतला जात नव्हता. आगामी काळातील राजकारण पाहता भाजपने दोन पावले मागे घेणे पसंत केले आहे.

Madha Lok Sabha | माढ्याचा तिढा वाढला! दोन्ही राजकारणी ‘बंधू’ महायुतीच्या विरोधात; पहा, काय घडतंय?

ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर भाजपकडून या जागेवर दावा केला जात होता. यामागे काही कारणे देखील आहेत. या मतदारसंघातील विद्यमान खासदार राजन विचारे उद्धव ठाकरे गटात आहेत त्यामुळे ही जागा एकनाथ शिंदेंना न देता भाजपने घ्यावी, असा युक्तिवाद भाजप नेत्यांकडून केला जात होता. मात्र शिंदे गटाकडून जागा सोडण्यास नकार दिला जात होता. आता मात्र हा मतदारसंघ शिंदे यांना मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून एकनाथ शिंदे राजन विचारे यांच्या विरोधात कुणाला तिकीट देतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment