Terrorism : दहशतवादाविरोधात (Terrorism) लढण्यात पाकिस्तानने (Pakistan) चालढकल केली असताना भारताने मात्र या राक्षसावर जोरदार प्रहार केला आहे. भारताच्या या कामगिरीचे कौतुक करत अमेरिकेने (America) भारताची पाठ थोपटली आहे. भारत सरकारने दहशतवादाविरोधात मोठे काम केले आहे. अमेरिकन सरकारच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
दहशतवादी संघटनांची ओळख पटवणे, त्यांचा नायनाट करणे आणि दहशतवादाचा धोका कमी करण्यात भारताने मोठे काम केले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या ब्युरो ऑफ काउंटर टेररिझमच्या ‘कंट्री रिपोर्ट्स ऑन टेररिझम 2021: इंडिया’ या अहवालानुसार जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश, ईशान्य राज्ये, मध्य भारतातील काही भाग भारतातील दहशतवादाने प्रभावित आहेत.
- Sim Card Rules: मोठी बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार नाही नवीन सिम ; जाणुन घ्या कारण
- Aadhaar Card: सावधान! चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बनवणाऱ्यांवर होणार ‘ही’मोठी कारवाई; सरकारने दिली माहिती
- Maharashtra IMD Alert & Weather Forecast: शेतकऱ्यांनो तयारीत रहा; ‘त्या’ दिवशी होणार आहे अवकळी पाऊस
- WhatsApp New Features: भारीच.. आता व्हाट्सअप फोटोंमधून टेक्स्ट होणार कॉपी! जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट
- आनंदाची बातमी! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे OnePlus चा नंबर 1 5G स्मार्टफोन; पहा ऑफर
अहवालानुसार दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. 2021 मध्ये दहशतवादी संघटनांनी त्यांच्या रणनितीत थोडा बदल केल्याचे दिसून आले आणि आता ते सामान्य नागरिकांना लक्ष्य करून ड्रोन आणि आयईडी इत्यादी स्फोट घडवत आहेत.
अहवालात दावा करण्यात आला आहे की 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये 153 दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये 45 सुरक्षा दलाचे जवान, 36 नागरिक आणि 193 दहशतवादी अशा एकूण 274 लोकांचा मृत्यू झाला. अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील दहशतवाद प्रभावित क्षेत्रात फारसा बदल झालेला नाही.भारताने राज्य आणि केंद्र पातळीवर गुप्तचर यंत्रणा मजबूत केल्या आहेत.
भारताने बंदरांच्या सुरक्षेसाठी प्रवेशद्वारावर बायोग्राफिक आणि बायोमेट्रिक स्क्रीनिंगची व्यवस्था केल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. विमानतळांवर दुहेरी तपासणी करण्याच्या उद्देशाने क्ष-किरण तपासणी करण्यात आली आहे.भारताची तपास संस्था NIA ने दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या आरोपाखाली शिक्षा दिली आहे. NIA ने सप्टेंबर 2021 मध्ये ISIS शी संबंधित 37 प्रकरणांचा तपास केला आणि 168 लोकांना अटक केली.
दहशतवादग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर लोककल्याणाच्या कामात कसे गुंतले आहे, याचाही या अहवालात उल्लेख आहे. यामध्ये शाळा चालवणे, वैद्यकीय शिबिरे उभारणे आणि तरुणांना प्रशिक्षण देण्यासह रोजगार उपलब्ध करून देणे, जेणेकरून तरुणांना कट्टरपंथी होण्यापासून रोखता येईल.