Bus Accident: पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, 13 जण ठार

Bus Accident :  पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune – Bengaluru National Highway) आज (शुक्रवारी) सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मिनी ट्रॅव्हलर बस महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. ही बस यात्रेकरूंनी भरलेली होती.  त्यामुळे 13 जणांचा जागीच मृत्यू झाला.

यामध्ये 2 मुले आणि 7 महिलांचाही समावेश आहे. ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॅव्हलरमध्ये एकूण 17 जण होते.

सर्व लोक शिवमोग्गा जिल्ह्यातील आहेत

या बसमध्ये प्रवास करणारे सर्व जण शिवमोग्गा जिल्ह्यातील असल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले आहे. या प्रवाशांचे घर भद्रावती तालुक्यातील येमहट्टी गावात आहे. हे सर्व लोक बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथील येल्लम्मा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून सर्वजण भद्रावतीला परतत असताना हा अपघात झाला.

कर्नाटक पोलिसांनी सांगितले की, या अपघातात जखमी झालेल्या एका महिलेने ट्रॅव्हलरचा चालक झोपला असल्याचे सांगितले. बसमधील सर्वांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले पण तो परत परत सांगत होता की त्याला पोहोचायला उशीर होईल. त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि त्यानंतर हा अपघात झाला. तो झोपला आणि थेट ट्रककडे गेला. अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment