Netflix Shares Fall: प्रेक्षकांच्या आवडत्या नेटफ्लिक्सलाही बसलाय मोठा झटका..! पहा नेमके काय आहे कारण
मुंबई : डिजिटल मीडिया (OTT) प्लॅटफॉर्म Netflix ने जवळपास दोन लाख सदस्य गमावले आहेत. ज्यामुळे कंपनीचे शेअर्स तब्बल 25 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या दशकभरातील नेटफ्लिक्सचे हे सर्वात मोठे नुकसान आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या तिमाही कमाईच्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीच्या ग्राहक संख्येत दोन लाखांनी घट झाली आहे. नेटफ्लिक्सची सेवा सुरू झाल्यानंतर कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत इतकी घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
याचेच दुष्परिणाम शेअर बाजारात दिसले आहेत. अमेरिकन शेअर बाजारात त्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या विक्रीचा जोर आहे. सहा वर्षांपूर्वी, चीन वगळता जगभरातील डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनोरंजन देणारी Netflix ही कंपनी सुरू झाली. विशेष म्हणजे कंपनीने युक्रेन युद्धाविरोधात युद्धखोर रशियासोबतचा व्यवसाय संपवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांची संख्या सात लाखांनी कमी झाली होती. त्यातच हा नवा फटका बसल्याने शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरबाबत विक्रीचा जोरदार प्रवाह वाहत आहे. अशातच Netflix ने एप्रिल-जून कालावधीत दोन दशलक्ष सदस्य गमावण्याची अपेक्षा असल्याचे म्हटलेले आहे. त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे. (Netflix Shares Fall 25 Percent After Losing Two Lakh Subscribers)
Farmers News: आनंदाची बातमी; पहा युद्धजन्य स्थितीतही कसा मिळाला आहे भारतीय शेतकऱ्यांना दिलासा https://t.co/yJ3zV0HXhd
Advertisement— Krushirang (@krushirang) April 20, 2022
Advertisement