Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. व्हॉट्सअॅप घेणार नाही आता जास्त इंटरनेट डेटा; फक्त ‘या’ सोप्या गोष्टी लक्षात ठेवा..!

मुंबई : व्हॉट्सअॅप हे एक प्लॅटफॉर्म आहे जे जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या इंटरनेटवर चालणाऱ्या मेसेजिंग अॅपद्वारे तुम्ही संदेश देवाणघेवाण, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करू शकता. जरी या प्लॅटफॉर्मचे अनेक फायदे आहेत. पण, यामध्ये इंटरनेट डेटाही जास्त वापरला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही WhatsApp वापराने जास्त इंटरनेट जास्त खर्च होणार नाही.

Advertisement

जर तुम्ही व्हॉट्सअॅप युजर असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो, की व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलद्वारे जास्त इंटरनेट डेटा खर्च होतो. व्हॉट्सअॅप कॉलमध्ये, एका मिनिटात 720Kb इंटरनेट वापरले जाते. तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर या स्टेपकडे लक्ष द्या. अॅपमध्ये तुम्हाला ‘स्टोरेज आणि डेटा’चा पर्याय दिसेल, त्यात ‘कॉल्स’ वर जा आणि ‘लेस डेटा पर्याय’ चालू करा. अशा प्रकारे व्हॉट्सअॅप कॉल दरम्यान कमी डेटा वापरेल.

Loading...
Advertisement

आयफोन वापरकर्ते व्हॉट्सअॅप कॉलवर खर्च होणारा मोबाइल डेटा देखील कमी करू शकतात. यासाठी तुम्हाला ‘स्टोरेज अँड डेटा’ या पर्यायावर यावे लागेल. येथे तुम्हाला ‘कॉलसाठी कमी डेटा वापरा’ असा पर्याय दिसेल. तुम्ही डेटा चालू करूनही सेव्ह करू शकता. व्हॉट्सअॅपमध्ये तुम्हाला ‘स्टोरेज आणि डेटा’ या पर्यायामध्ये ‘मीडिया ऑटो-डाउनलोड’चा पर्याय दिसेल. तुम्ही ते बंद केल्यास प्रत्येक फाइल आपोआप डाउनलोड होणार नाही आणि डेटा आणि स्टोरेज दोन्ही सेव्ह केले जातील. मीडिया फाइल पाठवण्याआधीही तुम्ही अॅपमध्ये जाऊन ‘मीडिया अपलोड क्वालिटी’ पर्याय घेऊ शकता. ‘डेटा सेव्हर’चा पर्याय घेतला तर तुमचा इंटरनेट डेटा कमी प्रमाणात खर्च होईल.

Advertisement

वाव.. व्हॉट्सअॅपने केलीय कमाल..! ‘त्यासाठी’ घेणार तब्बल 500 गावे दत्तक; पहा, कोणता आहे प्रोजेक्ट ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply