Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! आता रेल्वेचा प्रवास होणार आधिक सुरक्षित; पहा, रेल्वेने काय आणलेय तंत्रज्ञान..

मुंबई : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशात रेल्वेने प्रवास करणे आता अधिक सुरक्षित होणार आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व मध्य रेल्वे (ECR) विभाग लवकरच ‘कवच’ नावाची प्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रेल्वे सुरळीत चालण्यास मदत होणार आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 2022-23 मध्ये सुरक्षेसाठी स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान कवच (कवच तंत्रज्ञान) अंतर्गत 2,000 किमीचे नेटवर्क आणले जाईल. रेल्वेचे जाळे सुरक्षित करण्याबरोबरच त्याच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीनेही या तंत्रज्ञानाच उपयोग होणार आहे.

Advertisement

ईसीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ही प्रणाली पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन धनबाद मार्गावर स्थापित केली जाईल आणि त्यासाठी अंदाजे 151 कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 408 किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग देशातील 77 रेल्वे स्टेशन आणि 79 लेव्हल क्रासिंग गेट समाविष्ट करणारा एक महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर ताशी 130 किमी वेगाने रेल्वे चालवण्यास विभागाने परवानगी दिली आहे.

Advertisement

या प्रणालीचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, की कवच हे टक्करविरोधी तंत्रज्ञान आहे जे आपल्याला रेल्वे ट्रॅकवर शून्य अपघात होण्यास मदत करेल. ही प्रणाली मायक्रो प्रोसेसिंग, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम आणि रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. हे उपकरण संपूर्ण मार्गावर असलेल्या रेल्वे स्टेशनबरोबर थेट रेडिओ प्रणालीद्वारे जोडणाऱ्या लोकोमोटिव्हच्या केबिनमध्ये स्थापित केले जाईल. स्टँडर्ड्स रिसर्च ऑर्गनायझेशनने ही प्रणाली डिझाइन आणि विकसित केली आहे. डिव्हाइसमध्ये अंगभूत ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टीम आहे जी सेन्सर्सद्वारे पुढच्या किंवा मागील प्रवासी ट्रेनच्या टक्कर संभाव्यतेची तपासणी करेल.

Loading...
Advertisement

रेल्वे टक्कर टाळण्यासाठी, भारतीय रेल्वेने TCAS (ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टीम) ही पूर्णपणे स्वदेशी प्रणाली विकसित केली आहे. लाल अवस्थेत सिग्नल पार करू नये, परवानगीपेक्षा जास्त वेगाने ट्रेन चालणार नाही आणि समोरासमोर धडकून होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेवर टीसीएएस ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे, ज्याला कवच असे नाव देण्यात आले आहे.

Advertisement

आता रेल्वेचे तत्काळ तिकिट मिळवा घरीच.. IRCTC ने आणलीय खास सुविधा.. जाणून घ्या सविस्तर

Advertisement
Advertisement

Leave a Reply