Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचा इफेक्ट..! निवडणुकीत प्रचारही होणार ऑनलाइन; निवडणूक आयोगाने ‘त्या’ प्रचारावर टाकलीय बंदी..

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आज देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यंदा कोरोनाच्या संकटात निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराबाबतही काही नियम केले आहेत. या नियमांचा उमेदवारांना मात्र चांगलाच फटका बसणार आहे. कारण, निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत अनेक महत्वाच्या गोष्टींवर बंधने टाकली आहेत. ही बंदी कायम राहणार किंवा नाही, याबाबत माहिती सुद्धा 15 जानेवारीनंतर जाहीर केली जाणार आहे.

Advertisement

इच्छुक उमेदवारांना जो काही प्रचार करायचा आहे, तो त्यांनी शक्यतो जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर द्यावा, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे यासोबत त्यांनी ऑफलाईन प्रचारावर मोठ्या प्रमाणात बंदी घातली आहे. प्रचारसभा, रॅली, मोटारसायकल रॅली, व्हेइकल रॅली अशा कोणत्याही प्रकारच्या ऑफलाईन प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. दरम्यान, या बंदीबाबतचा पुढील निर्णय 15 जानेवारीची कोरोना परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे.

Loading...
Advertisement

रोड शो, रॅली, पदयात्रा, कुठल्याही प्रकारच्या रॅलीला परवानगी नसेल. इतकेच काय तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत रॅली, सभांना परवानगी असणार नाही, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॉर्नर सभा, गावागावात होणारा प्रचार याबाबतही जर नियम पाळले गेले नाही, तर कडक कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाची 5 राज्यातली निवडणूक ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीही अत्यंत अटीतटीची आणि डिजिटल निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्हर्च्युअल रॅली नेमकी कशी असेल, हेही पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

मोठी बातमी : 5 राज्यांतील निवडणुका जाहीर.. जाणून घ्या, कधी होणार मतदान..काय आहे वेळापत्रक

Advertisement
Advertisement

Leave a Reply