Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काम की बात : आता तुमचा लॅपटॉप कधीच स्लो होणार नाही; फक्त करा इतकेच काम..

मुंबई : सध्याच्या काळात कामकाज ऑनलाइन झाले आहे. कोरोना काळात तर वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे लॅपटॉप, स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या इलेक्ट्रॉनिक्स साधनांच्या मदतीने कामकाजात वेग आला आहे. आता तर स्मार्टफोन आणि लॅपटॉप नसेल तर काही काम करणेच शक्य होणार नाही अशी परिस्थिती आहे. मात्र बऱ्याचदा स्मार्टफोन, लॅपटॉप स्लो होणे किंवा हँग होण्याची समस्या निर्माण होते. अशा वेळी कामकाज अडकून पडते तसेच डेटा सुद्धा सेव्ह होत नाही. अशा परिस्थितीत चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, त्याबाबत माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

अनेकदा लॅपटॉप हँग होण्याची समस्या जेव्हा डिव्हाईस पूर्णपणे अपडेट नसते तेव्हा उद्भवते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा लॅपटॉप वेळोवेळी अपडेट करत राहायला हवे. अपडेट केल्याने सिस्टममध्ये नवीन वैशिष्ट्ये आणि कार्ये जोडली जातात. हे सिस्टमच्या वेगात वाढ करण्यास मदत करते.

Advertisement

अनेकदा आपल्या कॉम्प्यूटरवर अँटीव्हायरस नसताना, व्हायरस किंवा काही प्रकारचे मालवेअर येतात. यामुळे आपला लॅपटॉप खूप हँग होतो. अशा स्थितीत लॅपटॉपमध्ये नेहमी विश्वासार्ह अँटीव्हायरस बसवून ठेवा. याशिवाय तुमच्या सिस्टीमवर कधीही अविश्वसनीय अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल करू नका.

Loading...
Advertisement

सामान्यपणे कमी रॅम स्टोरेजमुळे लॅपटॉप हँग होतात. अशा परिस्थितीत लॅपटॉपच्या रॅम स्टोरेजमध्ये वाढ करणे गरजेचे ठरते. तुम्ही तुमच्या कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपम मध्ये 8GB RAM इन्स्टॉल करू शकता. यामुळे तुमचा लॅपटॉप स्लो होण्याची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

Advertisement

लॅपटॉपवर काम करताय; ‘ही’ घ्या काळजी, अन्यथा…

Advertisement
Advertisement

Leave a Reply